सामान्यपणे मोड आलेली कडधान्ये जवळपास सगळ्याच घरांमध्ये खाल्ली जातात. आजकाल मोड आलेली कडधान्ये खाण्याचा ट्रेण्ड जास्तच वाढलाय. कारण यातून शरीराला अनेक फायदे मिळतात. हेल्दी, फिट आणि स्लिम राहण्यासाठी मोड
आलेली कडधान्ये खाण्याचा सल्ला दिला जातो. साधारणपणे चणे, मूग, मटकी, मेथी
ही धान्य सलाद, भाजी आणि डोसा बनवण्यासाठी वापरली जातात. सकाळी भरपूर
स्प्राउट्सच खाणं पसंत करतात. कारण हा एक पोट भरणारे आणि एनर्जी देणारा असा
नाश्ता ठरतो. पण भरपूर लोकांना स्प्राउट्स खाण्याची योग्य पद्धतच माहीत
नसते. त्यामुळे हेल्दी आहार घेऊनही त्यांना आरोग्यासंबंधी समस्या होत
राहतात. अशात मोड आलेले कडधान्य कसे खावेत हे जाणून घेऊया.
कच्चे स्प्राउट्स खावेत की नाही?
मोड
आलेली कडधान्ये कच्चे खाल्ले तर यातून शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात. पण
कच्च्या स्प्राउट्समध्ये साल्मोनेला आणि ई.कोली सारखे बॅक्टेरियाही असतात,
ज्यामुळे फूड पॉयजनिंगचा धोका असतो. त्यामुळे स्प्राउट्स कच्चे न खाण्याचा
सल्ला एक्सपर्ट देत असतात.
वाफवून खा
आयुर्वेदानुसार,
मोड आलेली कडधान्य तुम्ही थोडा वेळ वाफवून किंवा उकडून खावेत. यामुळे पोट
बिघडण्याचा आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शनचा धोका कमी राहतो.
उपाशीपोटी खाणं टाळा
सकाळी
नाश्त्यात स्प्राउट्स खाणं फायदेशीर अससतं, पण ते कधीही उपाशीपोटी खाऊ
नयेत. सकाळी पाणी किंवा ज्यूस प्यायल्यानंतरच तुम्ही स्प्राउट्स खाऊ शकता.
उपाशीपोटी खाल तर पोट फुगण्याचा धोका असतो.
हर्ब्स आणि मसाले टाकून खा
वातावरणानुसार
मोड आलेल्या कडधान्यात तुम्ही वेगवेगळे हर्ब्स टाकून खाऊ शकता. यात तुम्ही
काळं मीठ, पुदिना, आलं आणि काळी मिरी पूड टाकून खाऊ शकता. यानं आरोग्याला
फायदे मिळतील.
कमी प्रमाणात खाणंच फायदेशीर
एका दिवसात एक किंवा दोन वाटीच स्प्राउट्स खाणं ठीक राहील. यापेक्षा जास्त खाल तर पोट बिघडू शकतं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.