Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ज्या भ्रष्टाचाराची माहिती मी पंतप्रधानांना दिली होती, त्याच भ्रष्टाचारात मला गोवलं - सत्यपाल मलिक

ज्या भ्रष्टाचाराची माहिती मी पंतप्रधानांना दिली होती, त्याच भ्रष्टाचारात मला गोवलं - सत्यपाल मलिक
 

जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी किरू जलविद्युत प्रकल्पाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने (CBI) दाखल केलेल्या चार्जशीटनंतर मौन सोडले आहे. मलिक हे 11 मे पासून दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल आहेत. त्यांनी शनिवारी एक्स वर एक पोस्ट करून भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले आहेत की, “मी गेल्या एक महिन्यापासून रुग्णालयात दाखल आहे आणि मला किडनीचा त्रास आहे.”

सत्यपाल मलिक म्हणाले की, “काल सकाळपासून मी ठीक होतो, पण आज पुन्हा मला आयसीयूमध्ये हलवावे लागले. माझी प्रकृती खूप गंभीर होत चालली आहे. मी जगलो किंवा राहिलो नाही तरी, माझ्या देशवासियांना सत्य सांगू इच्छितो. जर आज माझ्याकडे पैसे असते तर मी खाजगी रुग्णालयात उपचार करून घेतले असते. ज्या टेंडरमध्ये ते मला अडकवू इच्छितात ते मी स्वतः रद्द केले होते, मी स्वतः पंतप्रधानांना हे सांगितले होते.”

सत्यपाल मलिक म्हणाले, “मी राज्यपाल असताना मला 150 कोटी रुपयांची लाच देऊ करण्यात आली. माझे राजकीय गुरू, दिवंगत शेतकरी नेते चौधरी चरण सिंह यांच्याप्रमाणे मी प्रामाणिकपणे काम करत राहिलो. माझी प्रामाणिकता कधीही डगमगली नाही. मी राज्यपाल असताना शेतकरी चळवळ सुरू होती, मी कोणत्याही राजकीय लोभाशिवाय शेतकऱ्यांच्या मागण्या मांडल्या. मी महिला कुस्तीगीरांच्या चळवळीत त्यांच्यासोबत होतो. मी पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांचा मुद्दा उपस्थित केला.”

ते म्हणाले, “सरकार सीबीआयला पुढे करून मला खोट्या आरोपपत्रात अडकवण्याचे निमित्त शोधात आहे. ज्या प्रकरणात ते मला अडकवू इच्छितात त्या प्रकरणात मी स्वतः निविदा रद्द केली होती. मी स्वतः पंतप्रधानांना सांगितले होते की, या प्रकरणात भ्रष्टाचार झाला आहे आणि त्यांना सांगितल्यानंतर मी स्वतः निविदा रद्द केली. माझ्या बदलीनंतर, ही निविदा दुसऱ्याच्या स्वाक्षरीने करण्यात करण्यात पास करण्यात आली.” दरम्यान, 22 मे रोजी सीबीआयने जम्मू आणि कश्मीरच्या किरू जलविद्युत प्रकल्पाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात सत्यपाल मलिक यांच्यासह 5 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. त्यात सुमारे 2,200 कोटी रुपयांच्या नागरी कामांच्या कंत्राटांमध्ये अनियमितता असल्याचा आरोप आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.