Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

डिजिटल अरेस्टची धमकी देत मुंबईतील डॉक्टरकडून उकळले दोन कोटी ८९ लाख रुपये

डिजिटल अरेस्टची धमकी देत मुंबईतील डॉक्टरकडून उकळले दोन कोटी ८९ लाख रुपये
 

मुंबई: विलेपार्ले येथील एका ७३ वर्षीय डॉक्टरकडून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीने तब्बल २.८९ कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. नरेश गोयल प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात त्या डॉक्टरला डिजिटल अरेस्टची धमकी दिली होती. मात्र, मुंबई सायबर पोलिसांनी केलेल्या जलद कारवाईमुळे १.२९ कोटी रुपये गोठवण्यात आले. विलेपार्लेतील डॉक्टरला एका व्यक्तीचा व्हिडीओ कॉल आला होता. त्या व्यक्तीने स्वतःची ओळख 'ट्राय' चा अधिकारी म्हणून करून दिली. त्याच व्हिडीओ कॉलदरम्यान, फसवणूक करणाऱ्याने डॉक्टरला पोलिस अधिकारी, न्यायाधीश म्हणून ओळख करून देणाऱ्या लोकांशी बोलण्याची व्यवस्था केली.

डॉक्टरचे बँक खाते एका एअरलाइन कंपनीचे संस्थापक नरेश गोयल यांच्याशी संबंधित असलेल्या मनी लाँड्रिंगच्या संशयास्पद व्यवहारासाठी वापरले जात आहे, अशी सबब सांगून त्यांनी डॉक्टरला अनेक बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले.
अटक करण्याची धमकी

घाबरलेल्या डॉक्टरने २ ते ४ जूनदरम्यान आरोपीच्या बँक खात्यात सुमारे २.८९ कोटी रुपये पाठवले. त्यानंतरही त्यांनी डॉक्टरला अटक करण्याची धमकी दिली. फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी मुंबई सायबर पोलिसांशी संपर्क साधला.

१.२९ कोटी रुपये गोठवले
सायबर पोलिस पथकाने तातडीने कारवाई करत राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल पोर्टल (एनसीआरपी)वर गुन्हा नोंदवला. त्याचबरोबर संबंधित बँकांच्या नोडल अधिकाऱ्यांशी समन्वय साधला. त्यांच्या जलद प्रतिसादामुळे हस्तांतरित रकमेतून १.२९ कोटी रुपये गोठवले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.