पुणे: वैष्णवी हगवणे प्रकरणात आता नवनवे खुलासे अन् पोलीस खात्यातील बड्या अधिकाऱ्यांचे काळे कारनामे समोर येत आहेत. हगवणे कुटुंबाचे मामा असलेले जालिंदर सुपेकर यांच्यावरील भ्रष्टाचारांच्या आरोपांची भलीमोठी यादी समोर आली आहे. अशातच आता जालिंदर सुपेकर यांचे मेहूणे
शशिकांत चव्हाण यांनीही कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी जमवल्याची माहिती समोर
आली आहे. एका पीआयकडे ही शेकडो कोटींची प्रॉपर्टी आली कुठून असा सवाल आता
शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंनी उपस्थित केला आहे.
काय आहेत सुषमा अंधारेंचे आरोप?
पुण्यातील
पोलीस खात्यात वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या शशिकांत भरत चव्हाण
यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचा आरोप करत सुषमा अंधारे
यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी गृहमंत्र्यांकडे सखोल चौकशीची मागणी
केली आहे. विशेष म्हणजे या साऱ्या आरोपांना आधार म्हणून संबंधित एफआयआर,
मालमत्ता दस्तऐवज आणि संबंधित बातम्यांचे संदर्भही देण्यात आले आहेत.
"शशिकांत चव्हाणांची बहीण ही सुपेकरांची बायको आहे. सुपेकर आणि वैष्णवीची सासू लता हे नातलग आहे. वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याची हिंमत पैसा, राजकीय वरदहस्त आणि नातलग मोठ्या पदावर असणे हे यामागचे कारण आहे. शशिकांत चव्हाणांनी बिल्डरकीचा व्यवसायाबद्दल पोलीस खात्याला कळवलं नव्हत'," असं सुषमा अंधारे म्हणाल्यात.तसेच भरत चव्हाण हे शशिकांत चव्हाणांचे वडील आहे. त्यांच्या आणि शशिकां चव्हाण यांच्या पत्नीच्या नावे मिळून रावेत, खारघर,कोरेगाव इथे जागा, घरकुलांचे प्रोजेक्ट , फ्लॅट अशा बऱ्याच मालमत्ता आहे. एका पीआयकडे शेकडो कोटींची संपत्ती आली कुठून. त्याचे स्त्रोत ईडीने तपासावेत, अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे.
दरम्यान,
शशिकांत चव्हाणांवर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोद आहे. त्यांच्या एफआयआर
माझ्याकडे असून ते जामिनावर आहेत. जामिनावर असताना त्यांचे प्रमोशन कसे
झाले ? पीआय शशिकांत चव्हाणांकडे इतकी संपत्ती आली कुठून ? ही त्यांची
प्रॉपर्टी आहे की सुपेकरांची का भागीदारीतील आहे ? असे महत्त्वाचे सवालही
सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.