शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. महाराष्ट्रात यापूर्वी झालेल्या गुन्हेगारीच्या घटना घडल्या आहे. अगदी बदलापूर शाळेतील मुलीवर लैंगिक शोषण असो वा बसमध्ये शालेय विद्यार्थीनीवर विनयभंगासारख्या घटना असो.
यासाठी राज्य सरकारकडून पूर्वयोजना केल्या जात आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय बस चालकांची पार्श्वभूमी तपासली जाणार आहे. दर आठवड्याला त्यांची मद्यपान व औषध चाचणी करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. शालेय विभागाने जारी केलेले नवीन नियम राज्यातील सर्वच शाळांना लागू करण्यात आले आहेत. शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या निर्णयानुसार चालक, सफाई कामगार, महिला सेविकांची सकाळी आणि सायंकाळी अशी दोने वेळेस चाचणी होणे गरजेचे आहे.अनधिकृत व्यक्तींना बसमध्ये प्रवेश करता येणार नसल्याचं सांगितलं जात आहे. तसेच खाजगी वाहनांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी चालकाची ओळख व पार्श्वभूमी शाळेला कळवावी, अशी सूचनाही शासन निर्णयामध्ये करण्यात आल्या आहेत. तसेच, पालकांनी चालकांची वैयक्तिक माहिती स्वतःकडे ठेवावी, चालकांची पार्श्वभूमी तपासून घ्यावी. तसेच बेपर्वा ड्रायव्हिंग आणि चालकाच्या भूतकाळातील अपघाताच्या घटनांचीही माहिती करून घ्यावीय. विद्यार्थ्यांसाठी खाजगी वाहतूक व्यवस्थेचा वापर करणाऱ्या पालकांनी शाळा व्यवस्थापनाला चालकाची पडताळणी आणि ओळख तपशीलांची माहिती देणे आवश्यक आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.