Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रायगड खाली करा! धनगर वस्तीला पुरातत्व खात्याकडून गड सोडण्याच्या नोटीसा

रायगड खाली करा! धनगर वस्तीला पुरातत्व खात्याकडून गड सोडण्याच्या नोटीसा
 

रायगड किल्ल्यावर असलेल्या धनगर समाजाच्या वस्तीला पुरातत्व खात्यानं नोटीस पाठवली असून गड रिकामा करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय पुरतात्व खात्याकडून पाठवण्यात आलेल्या नोटीसीमुळे गेल्या ७ पिढ्यांपासून गडावर राहणाऱ्या धनगर समाजाच्या लोकांवर बेघर होण्याची वेळ येऊ शकते. रायगड हा राष्ट्रीय वारसा स्थळ म्हणून संरक्षित आहे. एएसआयच्या नियमानुसार गडावर कोणतंही अतिक्रमण किंवा नवं बांधकाम बेकायदेशीर असल्यानं धनगर वस्तीतील लोकांना नोटीस पाठवण्यात आली आहे. धनगर वस्तीतील लोकांनी म्हटलंय की, आम्ही गेल्या ७ पिढ्यांपासून इथंच राहत आहे. या किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना दूध, दही, ताक, जेवण देऊन आमचा उदरनिर्वाह करतोय. आमचं जीवन या किल्ल्यावर अवलंबून आहे.

रायगड किल्ल्यावर बाजारपेठ, जगदीश्वर मंदिराच्या खालच्या परिसरात धनगर समाजाच्या काही लोकांची घरं आहेत. झोपडीवजा असलेल्या या घरातील लोक गडावर येणाऱ्या पर्यटकांना दूध, दही, ताक, चहा, नाश्ता आणि जेवण मागणीनुसार पुरवतात. यातूनच त्यांची उपजिविका चालते. रायगड किल्ल्यावर धनगर वस्तीला याआधीही अशीच नोटीस देण्यात आली होती. २०११ मध्ये पाठवण्यात आलेल्या नोटीसीला स्थानिक आणि शिवप्रेमी संघटनांकडून विरोध करण्यात आला होता. त्यावेळी नोटीस मागे घेतली होती. आता पुन्हा धनगर वस्ती रिकामी करण्याची नोटीस पाठवल्यानं स्थानिकांमधून याला विरोध होत आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.