सासरच्या लोकांना जावई थेट एका अन्य महिलेसोबत लॉजवर सापडल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील हणबरवाडी या ठिकाणी घडली. थेट महिलेसोबत आणि ते सुद्धा सासरवाडीच्या लोकांना थेट लाॅजवर सापडल्याने जावयाचा इगो चांगलाच दुखावला आणि त्याने सासरवाडीच्या एका महिलेला डोक्यात बॅटन मारून जखमी केले. काही क्षणात सुरु झालेल्या या वादाने लॉजच्या दारामधील ड्रामा पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. या संदर्भात इस्पूर्ली पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
लॉजिंगच्या दारामध्ये जावयाची गाडी दिसून आली
मिळालेल्या माहितीनुसार, वरणगे पाडळी येथील एक तरुण आहे. तो विवाहित आहे. मात्र, त्याचं अन्य महिलेसोबत संबंध असल्याने तो लॉजवर आला होता. त्याच ठिकाणी हणबरवाडी येथील त्याच्या बायकोच्या मामा यांना लॉजिंगच्या दारामध्ये जावयाची गाडी दिसून आली. त्यामुळे त्यांनी अन्य नातेवाईकांना बोलावून घेतले. त्यामुळे लॉजच्या दारामध्ये नातेवाईक जमा झाल्यानंतर संबंधित तरुण लॉजमधून शिवीगाळ करत रागाने बाहेर पडला. यावेळी चांगलाच राडा झाला.
जावयाने सासरकडील लोकांना दमदाटी करत मारहाण करण्यास सुरुवात केली
यावेळी इगो दुखावलेल्या जावयाने सासरकडील लोकांना दमदाटी करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर सासरकडील लोकांनी फिर्याद दाखल केली. लॉजच्या दारात तो युवक चांगला संतापलेला दिसून आला. माझा कसला पाठलाग करता, मी तुम्हाला सोडणार नाही, मी कोण आहे ते तुम्हाला सांगतो असं म्हणत त्यांना नातेवाईकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याच्या सोबत असलेल्या महिलेनं सुद्धा मारहाण केली. या हाणामारीत एक महिला जखमी सुद्धा झाली. सासरवाडीतील एका महिलेच्या डोक्यात लाकडी पट्टी मारण्यात आली. त्यानंतर नातेवाईकांनी जावयाविरोधात फिर्याद दिली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.