Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वडिलोपार्जित जमीन नावावर करण्यासाठी घेतली लाच; दोन महिला तलाठी एसीबीच्या जाळ्यात

वडिलोपार्जित जमीन नावावर करण्यासाठी घेतली लाच; दोन महिला तलाठी एसीबीच्या जाळ्यात
 

नांदेड : वडिलोपार्जित असलेली शेती पत्नीच्या नावावर करण्यासाठी तक्रारदाराने तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. हि जमीन नावावर करण्यासाठी तलाठ्यांकडून पैशांची मागणी करण्यात आली. दरम्यान हे काम करण्यासाठी १६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोन महिला तलाठ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

वडिलोपार्जित शेती पत्नीच्या नावावर करण्यासाठी १६ हजारांची लाच घेताना तलाठी भाग्यश्री तेलंगे व सुजाता गवळी असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतलेल्या महिला तलाठीचे नाव आहे. दरम्यान तक्रारदाराने वडिलोपार्जित सात एकर शेतीपैकी साडेतीन एकर शेती पत्नीच्या नावावर करण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. हि जमीन नावावर करण्यासाठी तलाठी भाग्यश्री तेलंगे यांची भेट घेतली असताना त्यांनी ४० हजारांची, तर तडजोडीनंतर १७ हजारांच्या लाचेची मागणी केली.
दोघांना रंगेहाथ पकडले

याबाबतची तक्रार एसीबीकडे २९ मे रोजी दाखल करण्यात आली होती. यानंतर लाचलुचपत विभागाच्या पथकाने तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता दोन्ही तलाठ्यांनी मिळून १६ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. ती स्वीकारताना दोघींना रंगेहाथ पकडण्यात आले. तलाठी तेलंगे यांच्या ताब्यातून सहा हजार ६२० रुपये रोख व दोन मोबाइल, तर गवळी यांच्या ताब्यातून १८ हजार ८२० रुपये रोख मिळून आले

दोघांच्या घरांची झडतीची कारवाई
दरम्यान एलसीबीने ताब्यात घेतलेल्या दोन्ही महिला तलाठीच्या नांदेड व किनवट येथील घराची झडती सुरू असून पोलिस ठाणे किनवट येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दोघींना ताब्यात घेण्यात आले असून ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रीती जाधव यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस उपनिरीक्षक शेख रसूल, अरशद अहेमद खान, सयद खदीर, गजानन राऊत यांनी केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.