पुणे :- महिला पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पुण्यातील भाजप नेते प्रमोद कोंढरे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील फरासखाना पोलिसांनी ही कारवाई केली आहे. प्रमोद कोंढरे हे भाजप आमदार हेमंत रासने यांचे खंदे समर्थक आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुणे दौऱ्यावर असताना त्यांच्या भेटीदरम्यान ही घटना घडली. जिथे संबंधित महिला पोलीस अधिकारी सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात होती. यावेळी प्रमोद कोंढरे यांनी महिला अधिकाऱ्यासोबत कर्तव्यावर असताना गैरवर्तन केले. सीसीटीव्हीमध्ये देखील ही घटना कैद झाली आहे. महिला पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पुराव्याचा भाग म्हणून फुटेजची तपासणी केली जात आहे. प्रमोद कोंढरे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. चहा पीत असताना संबंधित महिला अधिकाऱ्याला चुकून धक्का लागला असल्याची कबुली प्रमोद कोंढरे यांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.