भारतीय रेल्वे 1 जुलै 2025 पासून नवीन भाडे दर लागू करणार आहे, त्यामुळे सामान्य आणि लांब पल्ल्याच्या प्रवाशांना थोडा जास्त खर्च करावा लागणार आहे. मात्र, काही श्रेणींमध्ये भाडेवाढ करण्यात आलेली नाही, ही दिलासादायक बाब आहे.
नवीन दरानुसार असे असतील बदल
सामान्य द्वितीय श्रेणी : 500 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी कोणताही दर वाढणार नाही. परंतु, 500 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवासासाठी प्रति किलोमीटर अर्धा पैसा (0.5 पैसे) अतिरिक्त द्यावा लागेल.
मेल/एक्सप्रेस गाड्या या गाड्यांमधील प्रवासासाठी आता प्रति किलोमीटर 1 पैसा जास्त मोजावा लागेल.
एसी वर्ग : एसी क्लासच्या तिकिटांमध्ये सर्वाधिक बदल करण्यात आले आहेत. यामध्ये प्रति किलोमीटर 2 पैसे वाढ करण्यात आली आहे.
शहरी गाड्या: शहरी ट्रेनच्या भाड्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, ज्यामुळे लाखो दैनंदिन प्रवाशांना दिलासा मिळेल.
मासिक सिझन तिकीट : मासिक सिझन तिकिटांच्या दरांमध्येही कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
या नवीन भाडेवाढीमुळे एसी आणि एक्सप्रेस गाड्यांचा प्रवास थोडा महाग होणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.