Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पृथ्वीराज बाबा तुम्ही सध्या तनाने व मनाने कुठल्या पक्षात आहात:, किशोर शहा, संतोष पाटील, उत्तम साखळकर,प्रशांत पाटील, प्रकाश मुळके

पृथ्वीराज बाबा तुम्ही सध्या तनाने व मनाने कुठल्या पक्षात आहात:, किशोर शहा, संतोष पाटील, उत्तम साखळकर,  प्र शांत पाटील, प्रकाश मुळके
 

एकदा तुमची नार्को टेस्ट करूया म्हणजे तुम्ही 75 हजार मतदारांचा कसा अपमान केलेला आहे तो कळेल. शेतकरी बँकेच्या ठेवीदारांच्या बाबतीत तुमचा कळवळा आता लक्षात आला आहे. ह्या शेतकरी बँकेचे मोठे कर्जदार तुमचा प्रचार करत होते, त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करणार आहात.  सांगली जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे आमदार, संघटनेतील एक मोठे पदाधिकारी, मुंबईतील विधान परिषदेचे आमदार यांच्यामागे आपण भाजपच्या प्रवेशासाठी स्वतःहून लागला आहात याबाबत तुम्ही काय खुलासा करणार आहात. वहिनींना भाजपने ऑफर दिली, पण ज्या दिवशी वहिनींचा प्रवेश होता त्या दिवशी माझाही प्रवेश घ्या म्हणून तुम्ही मुंबईत कोणाकडे बसला होता व त्यांनी तुम्हाला का वेटिंग वर ठेवले तसेच भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्यासाठी गेल्या चार महिन्यात तुम्ही कोणा कोणाला भेटला आहात व काय काय प्रयत्न केलेत हे तुमच्या बरोबर आम्हाला सुद्धा माहिती आहे. त्यामुळे नाईलाज म्हणून तुम्ही काँग्रेसमध्ये असला तरी मनाने कुठल्या पक्षात आहात हे जग जाहीर आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षपदा बाबत आपण जे बोलत आहात तो तुमचा अधिकार नाही. त्याबाबत तुम्ही न बोललेलेच बरे. तुमच्या स्वतःच्या संस्था आणि मुंबईमधील सिडकोच्या जागेत नवीन होत असलेल्या आपल्या संस्था वाचवण्यासाठी तुम्ही सध्या सत्ताधारी पक्षाच्या मागे लागला आहात का? 
 
तुम्हाला जनतेने दोन वेळा नाकारले असून गेल्या दहा वर्षापासून तुम्ही शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहात ते पद तुम्ही आता सोडा आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी द्या. तुमच्याही घरात खासदारकी, मंत्रीपद होते. तुम्हालाही दोन वेळा काँग्रेसने उमेदवारी दिली. दहा वर्ष जिल्हाध्यक्ष पद दिले. मात्र एकही नगरसेवक तुम्ही निवडून आणू शकला नाही. मात्र अनेक नगरसेवक कार्यकर्ते, जिल्हा परिषद सदस्य असून सुद्धा स्वर्गीय मदनभाऊंच्या पश्चात काँग्रेस सांभाळूनही काँग्रेसने वहिनींना काय दिले? एक महिला संघर्ष करीत असताना कोणती ताकद पक्षाने दिली. आणि याला अन्याय न म्हणता एकही नगरसेवक नसणाऱ्याला दोन वेळा काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली याला अन्याय म्हणायचे का?

आमच्या नेत्यांनी कोणती असेल ती भूमिका जाहीरपणे आणि छातीठोकपणे घेतली आहे. लोकसभेला तुम्ही कोणाचा प्रचार केला, काँग्रेसमध्ये राहून तुम्ही कोणता अजेंडा राबवला आहात हे सर्वजण जाणून आहेत. शेतकरी बँकेच्या बाबतीत आम्ही जबाबदारी कधीही झीडकारली नसून आम्ही त्याला सामोरे जात आहोत. ठेवीदारांच्या पैशाची काळजी आहे आणि ते देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

कळावे,
आपले 
किशोर शहा 
संतोष पाटील 
उत्तम साखरकर 
प्रशांत पाटील 
प्रकाश मुळके

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.