दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन तसेच महाराष्ट्र राज्य जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य श्री. रावसाहेब पाटील आणि इतर मान्यवरांचा उद्या मंगळवार, दि. २४ जून रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश होणार आहे. हा प्रवेश सोहळा भाजपा प्रदेश कार्यालय,
नरिमन पॉईंट, मुंबई येथे पार पडणार असून, याप्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष
मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा कार्यकारी अध्यक्ष मा. श्री. रवींद्र
चव्हाण, मुंबईचे पालकमंत्री मा. श्री. प्रभातसिंह लोढा, सांगली जिल्ह्यातील
आमदार व पदाधिकारी, प्रदेश उपाध्यक्ष, तसेच भाजपा जैन प्रकोष्ट महाराष्ट्र
राज्य अध्यक्ष मा. संदीप दादा भंडारी व भाजपा जैन प्रकोष्ट पश्चिम
महाराष्ट्र विभाग प्रमुख श्री. प्रशांत गोंडाजे यांची प्रमुख उपस्थिती
राहणार आहे. श्री. रावसाहेब पाटील यांनी समाजकार्य, आर्थिक विकास, आणि जैन
समाजाच्या कल्याणासाठी अनेक कार्ये केलेली असून, त्यांच्या प्रवेशामुळे
पक्षाची जैन समाजातील घडी अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत
आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.