महाराष्ट्र पत्रकार संघाच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय महाअधिवेशन आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात एका अनपेक्षित इच्छेने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. या सोहळ्यात राज्यस्तरीय नवरत्न पुरस्काराने सन्मानित झालेले सेवानिवृत्त कस्टम अधिकारी मदन लाला पवार यांनी, एका अनुभवी पत्रकाराच्या व्याख्यानाने प्रभावित होऊन, समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकार होण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली.
या अधिवेशनात विविध क्षेत्रांतील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. याच कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या किरण सोनावणे यांच्या प्रभावी भाषणाने अनेकांना पत्रकारितेकडे वळण्याची आणि समाजाला न्याय देण्याची प्रेरणा मिळाली. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना मदन पवार म्हणाले की, "मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि गेली अनेक वर्षे समाजाच्या विविध प्रश्नांमध्ये सक्रिय सहभागी आहे. जनतेचे प्रश्न, त्यांच्या वेदना आणि त्यांच्या संघर्षांमध्ये मी नेहमीच त्यांच्यासोबत राहिलो आहे." मात्र, महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आदरणीय किरण सोनावणे साहेबांचे भाषण ऐकल्यानंतर त्यांच्या मनात एक नवीन विचार रुजला तो म्हणजे, त्यांना पत्रकार व्हावेसे वाटू लागले.
सोनावणे यांच्या प्रभावी विचारांनी त्यांच्या मनावर इतका खोल ठसा उमटवला की, "पत्रकार असणं म्हणजे केवळ बातम्या देणं नव्हे, तर समाजात परिवर्तन घडवण्याचं सामर्थ्य असलेली लेखणी चालवणं आहे," अशी त्यांची धारणा झाली. व्यावसायिक पत्रकार नसलो तरी, एक जबाबदार पत्रकारासारखी भूमिका निभावता येईल का, या प्रश्नाचे उत्तर त्यांना स्वतःच्या अंतर्मनात "हो, नक्कीच!" असे मिळाले. कारण, लेखणी ही केवळ पत्रकाराची नसून, ती प्रत्येक संवेदनशील, जागरूक आणि सामाजिक बांधिलकी असलेल्या व्यक्तीच्या हाती असू शकते, असे ते म्हणाले.
आपल्या सामाजिक कार्याची आठवण करून देताना पवार यांनी सांगितले की, २००५ साली त्यांनी लेखणीच्या जोरावर तत्कालीन उद्योग मंत्री श्री. सुभाष देसाई यांच्या दालनात अर्धा तास कागदपत्रांसह प्रेडोंटेशन देऊन पेठ-वाघवाडी-जांभळवाडी एमआयडीसी' हाणून पाडली, हा एक इतिहास आहे. अशाच प्रकारे, त्यांनी अनेकदा कृतीच्या माध्यमातून समाजासाठी, विशेषतः शेतकऱ्यांसाठी काम केले आहे. आता या कार्याला विचारांच्या माध्यमातून, शब्दांच्या माध्यमातून आणि लेखणीच्या माध्यमातून विस्तारण्याची वेळ आली आहे, असे त्यांना वाटते. सत्य, वंचितांचे प्रश्न, लोकशाही मूल्ये आणि संविधानाची तत्त्वे शब्दबद्ध करून समाजासमोर मांडण्याचे सामर्थ्य ते स्वतःमध्ये शोधत आहेत.किरण सोनावणे यांनी टाकलेली ठिणगी आता मशाल बनावी, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. व्यावसायिक पत्रकार नसलो तरी, पत्रकारिता ही आता त्यांच्या अंतःकरणाचा अविभाज्य भाग बनली आहे. किरण सोनावणे यांना उद्देशून ते म्हणाले, "आदरणीय किरण सोनावणे साहेब, कालच्या प्रेरणादायी भाषणानंतर मनात उठलेल्या भावनांचे हे छोटे शब्दबद्ध प्रतिबिंब आहे. आपण टाकलेली ठिणगी माझ्या अंतर्मनात मशाल पेटवत आहे. मदन पवार यांच्या या मनोगतातून एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याची सामाजिक बांधिलकी आणि पत्रकारितेच्या माध्यमातून समाज परिवर्तनाची तीव्र इच्छा स्पष्टपणे दिसून येते.
यावेळी मदन पवार यांना पुरस्कार प्रदान करताना कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, पोलीस उपाधीक्षक सदानंद सदाशिव, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने मा.आम. सुजित मिणचेकर मा. आम. राजू किसनराव आवळे अविनाश बनगे, विजयसिंह माने राजू मगदूम आदि प्रमुख पाहुणे उपस्थित होते. याप्रसंगी महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर, राज्यउपाध्यक्ष सुनील कांबळे, राज्य संपर्क प्रमुख बाबासाहेब राशीनकर, राज्य कार्यकारिणी सदस्य पंढरीनाथ बोकारे, राजकुमार चौगुले जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्ये जिल्हाउपाध्यक्ष रमेश बोभाटे, तालुकाध्यक्ष पापालाल सनदी आयुब मुल्ला, संतोष भोसले यांच्यासह विविध पदाधिकारी कार्यकर्ते, पत्रकार उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.