ज्योती आदाटे यांचा प्रवास थक्क करणारा : प्रा. डॉ. मारूती पाटील प्रतिकूल परिस्थिती असतानाही, त्याला खंबीरपणे तोेंड देत, आई वडिलांची जबाबदारी सांभाळत, ज्योती आदाटे यांचा कार्यकर्ती ते नगरसेविका असा प्रवास थक्क करणारा आहे, त्यांचा आदर्श घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन गोकुळ दुध संघाचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रसिद्ध प्रवचनकार प्रा. डॉ. मारुती पाटील यांनी केले.
बेळगाव (कर्नाटक) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस ज्योती आदाटे यांना प्रा. डॉ. पाटील व मान्यवराच्या हस्ते कै. बसवंत नागू शिंगाडे सामाजिक सेवाभावी संस्थेचा राष्ट्रीय ‘फिनिक्स ग्लोबल अवॉर्ड 2025’ चा आदर्श समाजरत्न गौरव पुरस्काराने प्रदान करण्यात आला.डॉ. पाटील म्हणाले, ज्योती आदाटे यांच्या आयुष्यात लहानपणापासून संघर्ष आला आहे. त्यांनी प्रत्येक संकंटाचा सामना करीत तोंड दिले आहे. घरची जबाबदारी पेलत त्यांनी समाजकारणात उडी घेतली. त्यानंतर त्यांनी राजकारण सुरू केले. जनतेनी त्यांना तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून दिले. आजही त्या लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर असतात. याबरोबरच त्यांनी समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी काम करीत आहेत. एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो. त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, म्हणून संस्थेने त्यांना समाजरत्न पुरस्कार दिला आहे. त्या या पुरस्कारास पात्र आहेत, याचा आम्हाला अभिमान वाटतो.यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विक्रम शिंगाडे यांनी प्रास्ताविकात ज्योती आदाटे यांचा गौरव केला. संस्थेचे सचिवअॅड. प्रीती हट्टमणी, वरिष्ठ अधिकारी विठ्ठल हट्टीहोळी, बेळगावचे पोलिस उपनिरीक्षक, प्रसिद्ध लेखक आणि कवी प्रकाश कदम, मेंदू विकारतज्ज्ञ डॉ विक्रमसिंह जाधव, डॉ. अमीर शेख, बेळगावच्या सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव, प्रसिद्ध वक्ते प्रा. डॉ. पांडुरंग पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद पांडव, मोहन मालवणकर, पत्रकार साईनाथ जाधव , अंनिसची कार्यकर्ती प्रियांका तुपलोंडे, विद्रोही कवी सलीम मोमीन उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.