Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्र हदरला! पोलीस बापाकडून पोटच्या मुलीवर वर्षभर अत्याचार

महाराष्ट्र हदरला! पोलीस बापाकडून पोटच्या मुलीवर वर्षभर अत्याचार
 

अमरावती : महाराष्ट्राला हादरवणारी घटना अमरावतीतून उघडकीस आली आहे. अमरावती शहरात बापाने पोटच्या मुलीवर वर्षभर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा संतापजनक प्रकार घडला आहे. अत्याचार करणारा नराधम बाप हा पोलीस दलात कार्यरत असल्याचे उघडकीस आल्याने एकच संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी राजापेठ पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत पोलिस पित्याने सलग वर्षभर लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक तक्रार एका 24 वर्षीय तरुणीने अमरावतीच्या राजापेठ पोलिसांत केली आहे. या खळबळजनक प्रकारानंतर नात्याला काळीमा फासणाऱ्या पोलीस बापाविरोधात बलात्कार,विनयभंग आणि पोस्को अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 
 
मुलीवर अत्याचार होत असताना आरोपी बाप हा अमरावती ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असल्याची माहिती पुढे आली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून आरोपीने 4 जून रोजी सकाळी सात वाजता पीडित मुलीला घाणेरडा स्पर्श केला. त्यानंतर तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. वारंवार होणारा त्रास असह्य झाल्याने पीडित तरुणीने राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

लहाणपणीच लैंगिक जवळीक साधण्याचा नराधमाचा प्रयत्न

तरुणी २०१५ साली आठवीत असताना आरोपीने लैंगिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर काही दिवसांनी आईला बाहेरगावी पाठवून आरोपीने शारीरिक अत्याचार केल्याची तक्रार तरुणीने केली आहे. या प्रकारानंतर ही संपूर्ण माहिती आईला सांगितली.

मुलगी आणि बायकोला जीवे मारण्याची धमकी
शारिरीक अत्याचार केल्याची माहिती बाहेर गेली तर सर्वांना मारून टाकीन, अशी धमकी आरोपी बापाने तरुणी आणि तिच्या आईला दिली होती. अमरावती शहरातील या धक्कादायक प्रकारानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. आरोपी बापावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.