आदित्य हॉस्पिटलमध्ये राडा करणाऱ्यांवर कारवाई करा: शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचे पोलिस अधीक्षकांना निवेदन
सांगली : 'शहरातील आदित्य हॉस्पिटलमध्ये राडा करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी. या हल्ल्यामागील सूत्रधाराचा शोध घेऊन त्याच्यावर ही कारवाई करावी. जिल्ह्यातील हॉस्पिटल्सच्या सुरक्षेबाबत उपाययोजना कराव्यात,' अशी मागणी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या वतीने करण्यात आली आहे.
शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे
अध्यक्ष नितीन चौगुले यांनी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांची भेट घेऊन
त्यांना निवेदन दिले. यात म्हटले आहे की, डॉ. शरद सावंत यांच्या आदित्य
हॉिस्पटलमध्ये काही समाजकंटकांकडून तोडफोड केली आहे. याचा निषेध करतो.
हल्लेखोरावर व सूत्रधारावर कडक कारवाई करावी. नितीन चौगुले व कार्यकर्त्यांनी डॉ. सावंत यांची भेट घेऊन पाठिंबा व्यक्त केला. यावेळी जिल्हा प्रमुख मोहन शिंदे, सांगली शहर प्रमुख संदीप जाधव, आनंदराव चव्हाण, प्रशांत गायकवाड, प्रदीप पाटील, सुरेंद्र इंगळे, आशिष साळुंखे, अजय रेड्डी, सत्यजित संकपाळ, नेताजीराव घाटगे उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.