Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :- भाजी विक्रेत्याच्या खुनातील दोघांना अटक; आरोपींनी दिली खुनाची कबुली

सांगली :- भाजी विक्रेत्याच्या खुनातील दोघांना अटक; आरोपींनी दिली खुनाची कबुली
 

सांगली  : येथील शंभरफुटी रस्त्यावर भाजी विक्रेता महेश प्रकाश कांबळे (वय ४०, रा. आंबा चौक, यशवंतनगर) याचा खून केल्याप्रकरणी मुख्य संशयित मुजाहिद फिरोज शेख (वय २४), साथीदार जय सूरज पाटील (वय २१, दोघे रा.साई मंदिरजवळ, संजयनगर) या दोघांना सांगली शहर पोलिसांनी अटक केली. दोघांवर खून आणि 'ॲट्रॉसिटी' चा गुन्हा दाखल आहे. दोघांनी खुनाची कबुली दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मृत महेश कांबळे याने आर्थिक देवघेवीतून २०२१ मध्ये फिरोज ऊर्फ बडे शेख याचा खून केला होता. या खुनप्रकरणात तो २०२३ मध्ये जामिनावर मुक्त झाला. मृत फिरोजचा मुलगा मुजाहिद याला बापाच्या खुनामुळे महेशवर राग होता. तशातच महेश याचे मुजाहिदच्या नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध सुरू होते. त्यामुळे मुजाहिद याचा राग आणखीनच धुमसत होता. तो महेशचा काटा काढण्याची संधी शोधत होता. मुजाहिद आणि त्याचा साथीदार जय पाटील याने महेशचा काटा काढण्याचे ठरवले. दोघेजण पाठलागावर होते. दि. ५ रोजी सकाळी महेश हा शंभरफुटी रस्त्यावरील भाजीपाला बाजारात आला होता. महेश वाटेत लघुशंकेसाठी थांबला असता पाठलागावर असलेल्या मुजाहिद व जय याने त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. पोटात, डोक्यात धारदार शस्त्राने वार झाल्यानंतर महेश मृत झाला.


खुनानंतर संशयित दोघेजण तीन दिवस पोलिसांना चकवा देत होते. शहर ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरणच्या दोन पथकांना संशयितांचा माग काढण्याबाबत सूचना दिल्या होत्या. उपनिरीक्षक महादेव पोवार, अंमलदार संदीप पाटील, संतोष गळवे, गौतम कांबळे यांनी संशयित दोघे इनाम धामणी येथील विठ्ठल पाटील कॉलेजजवळ राष्ट्रीय महामार्गावर येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार परिसरात शनिवारी रात्री सापळा रचला. तेवढ्यात पुलाखाली दोघेजण बसमधून येऊन थांबल्याचे दिसले. पोलिसांना पाहून ते पळून जावू लागले. तेव्हा पाठलाग करून पकडले. दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली. गुन्हे प्रकटीकरणकडील अंमलदार सतिश लिंबळे, सिकंदर तांबोळी, विनायक शिंदे, रफिक मुलाणी, संतोष गळवे, योगेश सटाले, गणेश कोळेकर, संदीप कोळी, प्रशांत पुजारी, विशाल कोळी, योगेश हाक्के यांच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला.
कसून तपास करणार
पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा म्हणाले, महेश कांबळे याच्या खुनातील दोघा संशयितांना अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी केली जाईल. त्यांचा आणखी कोणी साथीदार आहे काय? त्यांना पलायनासाठी कोणी मदत केली काय? याचा तपास केला जाईल.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.