पती नीट सांभाळत नाही, याचा गैरफायदा घेत स्वतः विवाहित असतानाही ते लपवून ठेवून महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संशयित अब्दुलवाहिद दाऊद अतार (वय 33, रा.ज्येष्ठराज कॉलनी, शामरावनगर, सांगली) याला सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडिता ही पतीपासून वेगळी राहते. तिला पती नीट सांभाळत नाही, याची कल्पना संशयिताला होती. संशयित अब्दुलवाहिद याने 2021 पासून पीडित विवाहितेशी संपर्क वाढवला. आपला कायदेशीर विवाह झाला असताना त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. या संबंधातून पीडितेने एका अपत्याला जन्म दिला आहे.
अब्दुलवाहिद याचा अगोदरच विवाह झाला असून तो आपली फसवणूक करत असल्याचे लक्षात येताच पीडितेने त्याच्याशी शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला. त्यावेळी त्याने पीडितेस मारहाण केली. 'तुझ्या नवर्याला आपल्यातील संबंधाबाबत सांगून तुला बरबाद करेन', अशी धमकी देऊन त्याने वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. हे कृत्य तो सांगलीनजिकच्या एका गावातील लॉजवर करत होता. त्याच्या अत्याचाराला कंटाळलेल्या पीडितेने शुक्रवारी सांगली ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी अब्दुलवाहिद अतार याला अटक केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.