Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वैभव साबळेंवरील कारवाईमुळे दोडामार्ग शहरात खळबळ

वैभव साबळेंवरील कारवाईमुळे दोडामार्ग शहरात खळबळ


दोडामार्ग ः इमारतीचा बांधकाम परवाना देण्यासाठी सात लाखांची लाच मागितलेल्या सांगली महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांच्या अटकेचे वृत्त पसरताच संपूर्ण दोडामार्ग शहरात एकच खळबळ उडाली.


कारण श्री. साबळे यांनी कसई-दोडामार्ग नगरपंचायतचे पहिले मुख्याधिकारी म्हणून कार्यभार पाहिला होता. तसेच त्यांच्या शासकीय सेवेचीही ती सुरुवात होती.

सन 2015 मध्ये दोडामार्ग नगरपंचायतीची निर्मिती झाल्यानंतर सुरुवातीचा काहीकाळ या न. पं. चा कारभार प्रशासकाकडे होता. त्यानंतर 26 डिसेंबर 2016 रोजी कसई- दोडामार्ग नगरपंचायतचे पहिले मुख्याधिकारी म्हणून वैभव साबळे यांची थेट नियुक्ती झाली होती. विशेष म्हणजे आपल्या शासकीय सेवेची सुरुवात करणार्‍या वैभव साबळे यांनी दोडामार्ग नगरपंचायतमध्ये प्रथम प्रवेश करताना नगरपंचायतच्या प्रवेशद्वारावरील पायरीला हात लावून नमस्कार केला होता. त्यानंतर नगरपंचायतमध्ये जाऊन त्यांनी अधिकृतपणे आपला कार्यभार स्वीकारला होता.

नगरपंचायतचे पहिले मुख्याधिकारी म्हणून संपूर्ण दोडामार्ग शहरात त्यांच्याविषयी उत्सुकता होती. अल्पावधीतच त्यांनी संपूर्ण शहरवासीयांशी आपला संपर्क वाढवला होता. या सर्व पार्श्वभूमीवर सांगली महापालिकेत सध्या उपायुक्त म्हणून कार्यरत वैभव साबळेंवर लाचखोरीचा गुन्हा दाखल झाल्याची बातमी दोडामार्ग शहरात वार्‍यासारखी पसरली.

सोशल मीडियाच्या माध्यमातून श्री. साबळे यांचे कारनामे सर्वत्र पसरले. त्यांच्यावरील या कारवाईच्या बातमीने नगरपंचायत व नागरिकांमध्ये खळबळ उडाली. वैभव साबळे यांची 14 ऑक्टोबर 2018 रोजी दोडामार्ग मधून बदली झाली होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.