इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून डॉक्टरने व्हिडिओ व्हायरल...?, सांगलीतील घटनेनं खळबळ
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत शहरातील एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरवर गुन्हा नोंदवण्यात आला. डॉ. हर्ष राजेंद्र चोरारिया (वय २८, रा.सांगली, मूळ रा. मुंबई) असे त्याचे नाव आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्यात पीडितेने फिर्याद दिली.
बलात्कारासह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पीडिता सांगलीतील एका भागात राहते. त्या मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत. संशयिताने ऑक्टोबर २०२४ मध्ये मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.
त्यानंतर २९ डिसेंबर २०२४ आणि ११ जानेवारी २०२५ रोजी पीडितेचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर पीडितेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार डॉ. हर्ष चोरारिया याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक कविता नाईक यांनी फिर्याद घेतली असून, उपअधीक्षक प्रणील गिल्डा तपास करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.