Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आरोग्य क्षेत्रात क्रांती! जपानने बनवले कृत्रिम रक्त

आरोग्य क्षेत्रात क्रांती! जपानने बनवले कृत्रिम रक्त
 

आजच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जोरावर प्रत्येक गोष्ट साध्य केली जात आहे. याचदरम्यान जपानने एक किमया साधली. देशातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी जपान आर्टिफिशियल इंटेलिजन्स मोठ्याप्रमाणात वापर करत आहे. कोणत्याही आजारावरील उपचार सोपे करण्यासाठी जपान दररोज नव-नवीन मार्ग अवलंबवत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मदतीने ब्लड तपासणीचा रिपोर्ट काही मिनिटांत उपलब्ध करुन देण्यावर काम करत असताना जपानने ही किमया साधली. जपानने आर्टिफिशियल ब्ल्ड बनवले.

दरम्यान, जपानच्या नॅशनल डिफेन्स मेडिकल कॉलेज आणि इतर संस्थांमधील संशोधकांनी हे आर्टिफिशियल ब्ल्ड विकसित केले. गेल्या वर्षी जपानने आर्टिफिशियल ब्ल्ड बनवण्यासाठी क्लिनिकल अभ्यास सुरु करण्याची घोषणा केली होती. जपानने शेअर केलेल्या माहितीनुसार, आणीबाणीच्या काळात ट्रांसफ्यूजनसाठी आर्टिफिशियल ब्ल्डचा वापर केला जाऊ शकतो. ही माहिती गेल्या वर्षी नारा मेडिकल युनिव्हर्सिटीने शेअर केली होती. आता जपानने आर्टिफिशियल ब्ल्ड बनवून आरोग्य क्षेत्रात चमत्कार करुन दाखवला.
2030 पर्यंत आर्टिफिशियल ब्ल्ड वापरण्याचे लक्ष्य

दुसरीकडे, 2030 पर्यंत या आर्टिफिशियल ब्ल्ड व्यवहारिक वापरात आणण्याचे जपानचे उद्दिष्ट आहे. जपानमध्ये घटणारी लोकसंख्या ही एक मोठी समस्या आहे. येथे वृद्धांची संख्येत कमालीची वाढ झाली असून तुलनेत तरुणांची संख्या कमी आहे. आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास 2024 मध्ये जपानमध्ये 65 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे 36.25 दशलक्ष लोक होते, जे एकूण लोकसंख्येच्या 29.3 टक्के होते. त्याचवेळी, तरुणांची लोकसंख्या कमी आहे.

जपानला आर्टिफिशियल ब्ल्ड बनवण्याची गरज का पडली?
खरेतर, जपानमध्ये वृद्धांची संख्या जास्त आणि तरुणांची संख्या कमी असल्याने येथे रक्तपुरवठ्याची कमतरता आहे. कारण वृद्ध लोक रक्तदान करु शकत नाहीत. रेड क्रॉस सोसायटीनुसार, 65 वर्षांपर्यंतचे लोक रक्तदान करु शकतात. जरी उच्च वयोमर्यादा नसली तरी इतर पात्रता निकष पूर्ण करण्यासाठी तुमचे आरोग्य चांगले असले पाहिजे. रक्तदान हे 65व्या वर्षी किती लोक निरोगी आहेत यावर अवलंबून असते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.