Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत चारचाकीचे शोरूम फोडून १० लाख लंपास

सांगलीत चारचाकीचे शोरूम फोडून १० लाख लंपास
 

सांगली: सांगली - कोल्हापूर रस्त्यावरील अंकली गावाच्या हद्दीत चारचाकी वाहनाचे शोरूम फोडून चोरट्याने ९ लाख ५९ हजार रुपयांची रोकड लंपास केली. हा प्रकार बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडला. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून सहा ते सात चोरटे दिसत आहेत. चोरट्यांनी सुरक्षा रक्षकांवर दगडफेक केली. शोरूममधून तिजोरी उचलून बाजूच्या शेतात जावून फोडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

चोरीच्या घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगले, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी पहाटेच घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथक व फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. पोलिस उपअधिक्षक प्रनिल गिल्डा यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या.

याबाबत माहिती अशी की, सांगली - कोल्हापूर रस्त्यावर अंकली गावाच्या हद्दीत माय हुंडाई कंपनीचे शोरूम आहे. मध्यरात्री दीडच्या सुमारास शोरूमच्या पाठीमागील बाजूने सहा ते सात चोरटे आत शिरले. तिघेजण दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतून आत आले. त्यानंतर इतर चोरट्यांना शोरूममध्ये घेतले. अकौंटटच्या केबीनमध्ये चोरटे शिरले. केबीनच्या समोरील काच त्यांनी बाजूला गेली. दरवाजा न उघडताच ते केबीनमध्ये गेले. तेथील कपाटात असलेली तिजोरी कटर, कटावणी, मारतुलने बाजूला गेली. काही वेळानंतर चोरटे तिजोरी उचलून शोरूम बाहेर आले.
 
यावेळी शोरूमच्या सुरक्षेसाठी तीन सुरक्षा रक्षक तैनात होते. सुरक्षा रक्षक समोरील बाजूला असल्याने चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला नाही. चोरटे तिजोरी घेऊन जात असताना सुरक्षा रक्षकांना दिसले. त्यांनी चोरट्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी चोरट्यांनी सुरक्षा रक्षकांच्या दिशेने दगड फेकण्यास सुरूवात केली. त्यानंतर चोरट्यांनी तिजोरी उचलून कंपाऊंड भिंतीवरून बाजूच्या शेतात नेली. तिथे कटरच्या सहाय्याने तिजोरीचा पाठीमागील पत्रा कापून आतील ९ लाख ५९ हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला.
 



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.