गुरुवारी मध्यरात्री येथील मुख्य रस्त्यावरील चार दुकाने फोडून चोरट्यानी रोख व वस्तू स्वरूपात पाच हजारांची चोरी केली. सोमवार पेठेतील तीन दुकाने फोडली. गणेश जाधव यांच्या गॅरेजचे कुलूप तोडून गॅरेज मधील एक एक लिटरची आईलच्या बारा बाटल्या चोरट्यांनी लपास केल्या. त्यानंतर चोरट्यांनी राहुल किनीकर यांचे पद्मश्री किराणा स्टोअर्स दुकानाची तीन कुलपे तोडून बाजूच्या गटारीत टाकली व लाकडी दरवाजा उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानात विक्री साठी बरणीत ठेवलेले दोन किलो बदाम व दोन किलो काजू लंपास केले.
त्यानंतर नवीन शहा यांच्या बॅरलच्या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून शटर उचकटले. परतू शटर च्या आतल्या बाजूला जाड काच असल्याने चोरट्यांना आत प्रवेश करता आला नाही. त्यानंतर चोरट्याने बुधवार पेठेतील संदीप गटागट यांचे दुकान गाठले. सुरुवातीला त्यांनी परिसराची पाहणी केली. तिथे त्यांना बाहेरच्या बाजूला सीसीटीव्ही कॅमेरा दिसला. त्यावेळी त्यांनी सोबत आणलेल्या कटवणीने सीसीटीव्ही कॅमेरा फोडला. त्यानंतर त्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून लाकडी दरवाजा कटावणीने उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातील आणखी एक सीसी टीव्ही फोडून दुकानाच्या गल्ल्यातील एक हजार रुपये यांची चिल्लर रक्कम घेऊन पसार झाले. दुकान फोडत असताना दोन चोरटे तर मोटारसायकल वरून निघून जाताना तिसऱ्या चोरट्याचे सीसी टीव्ही मध्ये चित्रीकरण झाले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.