Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जागतिक योगदिन कार्यक्रमात जिल्ह्यात शिक्षण संस्था ताकदीने उतरणार...:- रावसाहेब पाटील

जागतिक योगदिन कार्यक्रमात जिल्ह्यात शिक्षण संस्था ताकदीने उतरणार... :- रावसाहेब पाटील
 

सांगली दि.१२: २१ जून हा दिवस दरवर्षी जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा हा दिन सांगली जिल्हा परिषद,विश्वयोग दर्शन सांगली आणि चितळे डेअरी भिलवडी यांच्या एकत्रित आयोजनाने वारकरी तालावर 'भक्ती योग' म्हणून दि. २१ जून २०२५ रोजी स. ८.०० ते ८.४५ या वेळेत संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे मुख्य केंद्र छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सांगली असून १० तालुक्यातील शाळा, महाविद्यालये ठिकाणे विहीत नोंदणीद्वारे निश्चित केली जाणार आहेत. सदर कार्यक्रमाची वर्ल्ड, आशियाई व इंडीया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद होणार आहे. 
या कार्यक्रमाला विहीत पध्दतीने जास्तीत जास्त नोंदणी करुन शाळा महाविद्यालयांचा लक्षवेधी सहभाग राहणार असून जिल्ह्य़ातील सर्व खासगी शिक्षण संस्थांना कळवले असून सर्व शिक्षण संस्था आपल्या शाळा महाविद्यालयांच्या माध्यमातून शिस्तबद्धपणे व ताकदीने या कार्यक्रमात उतरणार असल्याचे सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी सांगितले.योग हे संपूर्ण जीवनशैलीचे तंत्रज्ञान आहे. भक्तीमय वारकरी तालाची साथ हे यंदाच्या योगदिनाचे खास वैशिष्ट्य असल्याने शिक्षण, सांस्कृतिक आणि क्रिडा व आरोग्य याबाबत योगाचे महत्त्व अधोरेखित करणारे आहे. जिल्ह्यातील सर्व खासगी शिक्षण संस्थांनी या कार्यक्रमात आपल्या शाळा व महाविद्यालयांचा शिक्षण खात्याच्या सूचनेनुसार विहित पध्दतीने सहभाग नोंद करुन 'भक्ती योग' कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांगली जिल्हा परिषद, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागांना सहकार्य करावे असे आवाहन रावसाहेब पाटील यांनी केले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.