Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

साताऱ्यात खळबळ! आधी गुप्तांग कापलं मग जमिनीत अर्धवट पुरलं, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

साताऱ्यात खळबळ! आधी गुप्तांग कापलं मग जमिनीत अर्धवट पुरलं, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
 

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात एक अत्यंत भीषण आणि धक्कादायक हत्या उघडकीस आली आहे. युवकाचे गुप्तांग कापून हत्या केली असून, आरोपीने त्याचा मृतदेह अर्धवट जमिनीत पुरला. ग्रामस्थांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने पोलिसांना कळवले. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला असता, हत्या करण्यापूर्वी त्याचे गुप्तांग कापल्याचे दिसून आले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

संदिप रिटे असे मृत तरूणाचे नाव आहे. तो साताऱ्यातील फलटण येथील रहिवासी होता. काही दिवसांपूर्वी युवकाच्या पत्नीनं पती बेपत्ता झाली असल्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.युवकाचा शोध पोलिसांकडून सुरूच होता. दरम्यान, साताऱ्यातील फलटण येथील ठाकूरकी या गावात एकाचा अर्धवट पुरलेला मृतदेह गावकऱ्यांना आढळला.

ग्रामस्थांनी तातडीने फलटण पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून खोदकाम केल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. प्राथमिक तपासात खून करण्याआधी त्याचे गुप्तांग कापण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. तपास केला असता, बेपत्ता युवत संदिप असल्याचं स्पष्ट झालं. याची माहिती त्याच्या पत्नी आणि कुटुंबाला समजताच त्यांनी हंबरडा फोडला. हा खून नेमका कोणी आणि कोणत्या कारणाने केला, याचा तपास फलटण पोलिस करत असून, अद्याप आरोपींचा किंवा कारणाचा शोध लागलेला नाही. या घटनेची माहिती समोर येताच गावात खळबळ उडाली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.