मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळात मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक म्हणजेच पीए आणि ओएसडीच्या नियुक्ती संदर्भात सुरुवातीपासूनच कठोर भूमिका घेतली होती. त्यानंतर काही मंत्र्यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती.
मुख्यमंत्री कार्यालयातून मंत्र्यांच्या खासगी सचिवांना त्यांच्या मूळ विभागात जाण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, तोंडी आदेशाकडे संबंधित अधिकाऱ्यांनी कानाडोळा केला होता. मात्र आता पुन्हा एकदा स्वीय सहाय्यकांना तातडीने मूळ विभागात रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता महायुती सरकारमधील मंत्र्यांची धाकधूक वाढली आहे. यापूर्वी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकारमधील सात मंत्र्यांना पीएस आणि ओएसडी नियुक्त करण्याची परवानगी नाकारली होती.हा विषय अनेक दिवसांपासून चर्चेत होता. मात्र आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून मंत्र्यांचे पीए म्हणून कार्यरत असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या मुळ विभागात रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इतकेच नाही तर मूळ विभागात हजर न झाल्यास संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.