Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दारुसाठी पैसे दिले नाही, रागाच्या भरात नवऱ्याने घेतला बायकोचा जीव; मुंबई हादरली

दारुसाठी पैसे दिले नाही, रागाच्या भरात नवऱ्याने घेतला बायकोचा जीव; मुंबई हादरली
 

मुंबईमध्ये नवऱ्याने बायकोची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोरेगावमध्ये ही घटना घडली. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे नवऱ्याने बायकोचा जीव घेतला. आरोपीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला बांगुर नगर पोलिसांनी दोन तासांत अटक केली. या घटनेमुळे गोरेगावमध्ये खळबळ उडाली.

दारूच्या व्यवसनात अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. आर्थिक तंगी येण्यापासून ते कुटुंबाची फरफट दारूमुळे होते. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून नवऱ्याने बायकोची हत्या केल्याची घटना गोरेगावमध्ये घडली. गळा दाबून बायकोची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे गोरेगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेकडील भगतसिंग नगर नंबर २ मध्ये ही धक्कादायक घटना घडली. वसीम रफिक शेख (२५ वर्षे) असं आरोपीचे नाव आहे. वसीमला दारू पिण्याचे व्यसन होते. 
 
रोज तो दारू पिऊन बायकोशी वाद घालायचा. सोमवारी वसीमने दारूसाठी बायकोकडे पैसे मागितले. पण बायकोने पैसे देण्यासाठी नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या वसीमने रागाच्या भरात बायकोची गळा दाबून हत्या केली. बायकोची हत्या करून आरोपी वसीम पळून जाण्याच्या तयारीत होता. पण पोलिसांनी अवघ्या २ तासांच आरोपीच्या मुसक्या आवळल्या. बांगुरनगर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. आरोपीला अटकेनंतर कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने आरोपीची रवानगी पोलिस कोठडीत केली. सध्या आरोपी बांगुरनगर पोलिसांच्या ताब्यात असून पोलिस अधिकचा तपास करत आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.