"जमत असेल तर उपोषण सोडा, नाही तर.", बच्चू भाऊंना बावनकुळेंचे ते 'कडू' बोल जिव्हारी, खरंच ही दादागिरी ?
शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती, दिव्यांग, विधवा महिलांना 6 हजार रुपये मानधन, वंचित घटकांचे प्रश्न या मागण्यांसाठी बच्चू कडूंनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. बच्चू कडूंच्या या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. त्यांच्या आंदोलनाला आता राज्यातूनही अनेक नेते मंडळी आणि संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. बच्चू कडूंचे वजन दोन किलोंनी कमी झाले आहे. तर सरकार दरबारी सुद्धा हे आंदोलन मागे घेण्यासंदर्भात चर्चेचा मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला, पण त्यावरूनच सध्या वाद पेटला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कडूंना फोन केला. त्यांच्यातील संभाषणानंतर कडूंनी त्यांची तीव्र नराजी व्यक्त केली.
बावनकुळेंच्या भाषेवर बच्चू कडूंची हरकत
अमरावती जिल्ह्यातील मोझरी हे बेमुदत अन्नत्याग आंदोलन स्थळ झाले आहे. चौथ्या दिवशी बच्चू कडू यांना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोन केला. त्यानंतर कडू यांनी बावनकुळेंच्या भाषेला आक्षेप नोंदवला. सरकारने सरकाचे काम करावे आम्ही आमच काम करू.शेतकऱ्यांसाठी शेवट पर्यत काम करत राहू. बावनकुळे यांच्याशी बोललो. कॉल रेकॉर्ड असता तर दाखवलं असत ते कसे बोललो. ते म्हणाले की जमत असेल तर उपोषण सोडा, नाही तर राहू द्या. ही भाषा आहे का? असा सवाल बच्चू कडू यांनी केला.
ही दादागिरी खपवून घेणार नाही
बावनकुळे आमच्या भेटीला येऊ शकले नाही त्याच दुःख नाही. पण फोनवर बोलतानाचा त्यांचा भाव बरोबर नव्हता. बावनकुळे यांची फोनवर भाषा दादागिरी आणि दमदामटीची होती. ते आम्ही सहन करणार नाही. त्यांच्याकडून हे अपेक्षित नव्हतं. सत्तेतील मस्ती त्यांनी दाखवू नये. लाडक्या बहिणीच्या वेळी बैठका नाही घेतल्या. आता महिलांना अपात्र करता. तेव्हा निकष लावले नाही. आता आम्हाला निकष सांगता, असा घणाघात त्यांनी घातला. आधी का बैठकी घेतल्या नाही. बावनकुळे यांच्या भावना काळजीच्या नव्हत्या. ते माझे मित्र आहे. पण अस बोलतील असं अपेक्षित नव्हतं, असे बच्चू कडू म्हणाले.
बावनकुळेंनी आरोप फेटाळले
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांचे सर्व आरोप फेटाळले. कडू यांचे वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे मी आदर पूर्वक बोललो आहे. त्यांना विनती केली की मुंबई मध्ये बैठक लावू. मी त्यांची विचारपूस करण्यासाठी पोलीस अधिक्षक, जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले होते. वेगवेगळ्या विभागाचे बच्चू कडू यांनी प्रश्न मांडले आहे त्यांनी चुकीच्या पधतीने बोलवू नये. आंदोलनाला बसलेल्या व्यक्तींची काळजी घेतो मुख्यमंत्री यांच्याशी बोलून तातडीने बैठक घेऊ, असे ते म्हणाले
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.