Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'ते गुन्हे लपवण्यासाठी येत असतील,' बडगुजर यांना पक्षात घेण्यात भाजपा आमदाराचा विरोध !

'ते गुन्हे लपवण्यासाठी येत असतील,' बडगुजर यांना पक्षात घेण्यात भाजपा आमदाराचा विरोध !
 

शिवसेना ठाकरे गटातून बडतर्फ करण्यात आलेले नाशिकमधील बडे नेते सुधाकर बडगुजर  भाजपामध्ये जाणार अशी चर्चा आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर ही चर्चा सुरु झालीय. या चर्चेनंतर त्यांची ठाकरे गटातून हकालपट्टी जाहीर केली होती. पण, बडगुजर यांना भाजपामधून जोरदार विरोध होत आहे. नाशिक जिल्ह्यातल्या भाजपा आमदार सीमा हिरे  यांनी बडगुजर यांच्या भाजपा प्रवेशाला जोरदार विरोध केला आहे. हिरे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली. त्यांनी यावेळी बडगुजर यांचा इतिहास सांगत त्यांच्यावर जोरदार आरोप केले.

काय म्हणाल्या हिरे?
सीमा हिरे यांनी यावेळी सांगितलं की, बडगुजर विरोधात मी दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवली आहे. त्यांनी विखारी प्रचार करत, कार्यकर्त्यांना खूप त्रास दिला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे परदेशात कॅसिनो खेळल्याचे कथित फोटो बडगुजर यांनीच मीडियाला दिले. नारायण राणे यांना जेवण करताना अटक करण्यात आली होती. त्याचे तक्रारदार बडगुजर होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्तासोबतचा बडगुजर यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. बडगुजरच्या मुलाने एकावर गोळीबार केला. त्यांच्यावर 17 गुन्हे दाखल आहेत. ते गुन्हे लपवण्यासाठी भाजपामध्ये येत असतील, असा आरोप हिरे यांनी केला.

महापालिकेत आर्थिक व्यवहार होत नाही तोपर्यन्त बडगुजर टेंडर देत नाहीत. त्यांच्याच पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. आमची खात्री आहे की वरिष्ठ सर्व विचार करतील. बडगुजर यांना घेताना 10 वेळा पक्ष विचार करेल, त्यांचा प्रवेश होणार नाही, असा विश्वास हिरे यांनी व्यक्त केला. बडगुजर यांना पक्षात घेतलं तर आमचा पक्ष बॅकफुटवर जाईल. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना प्रवेश दिला जाणार नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.