मिरज : मिरजेत बोलवाड रस्ता परिसर व शहरात पाण्याची टाकी परिसरातील डॉक्टर पत्नीसह दोन महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. दोघींना घरात विलगीकरण करण्यात आले आहे. दोन्ही महिला बाहेरगावी जाऊन आल्यानंतर
त्यांना ताप, खोकला, कफ अशी लक्षणे जाणवू लागली. त्यांच्या नमुन्यांची
तपासणी केली असता त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे आरोग्य
प्रशासनातर्फे दोघींच्या संपर्कात आलेल्यांचे व त्यांच्या घरातील
व्यक्तींच्या तपासण्या करण्यात येत असल्याचे महापालिका आरोग्य अधिकारी डॉ.
वैभव पाटील यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.