Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आयर्विनला समांतर पुलाचे काम तातडीने पूर्ण करा आमदार गाडगीळ यांचे निर्देश; कामाची केली पाहणी

आयर्विनला समांतर पुलाचे काम तातडीने पूर्ण करा आमदार गाडगीळ यांचे निर्देश; कामाची केली पाहणी 
 

सांगली, दि.१४: येथील आयर्विन पुलाला समांतर पुलाचे काम तातडीने पूर्ण करा. हा पूल वाहतुकीसाठी लवकरात लवकर खुला करून नागरिकांची गैरसोय दूर करा , असे निर्देश आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. आर्यविन पुलाच्या समांतर नवीन पूलाचे काम सुरू आहे. आज या पुलाच्या उर्वरित कामाची  पाहणी आमदार गाडगीळ यांनी त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी आमदार दिनकरतात्या पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आमदार गाडगीळ म्हणाले, समांतर पुलाचे काम तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होईल. वाहतूकही अधिक सुलभ होईल.  यावेळी  सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता कीर्तीकुमार मिरजकर यांना आमदार गाडगीळ यांनी पुलाच्या कामा संदर्भात सूचना दिल्या. समांतर पुलाच्या कामाला आता अधिक गती मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सांगलीकरांसाठी लवकरच  हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे.  यावेळी माजी नगरसेवक अजिंक्य पाटील, गजानन आलदर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरद देशमुख, प्रवीण पाटील, शंकर पाटील, विकास सोसायटीचे अध्यक्ष सर्जेराव चव्हाण, भरत बर्गे, हरीश पाटील, रवी बाबर, हर्षल फल्ले, नंदकुमार वाडकर तसेच पदाधिकारी, सांगलीवाडीतील ग्रामस्थ, परिसरातील नागरिक आदी  उपस्थित होते.
फोटो 
 
सांगली : आयर्विन पुलाला समांतर पुलाचे काम वेगात सुरू आहे. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी शनिवारी या कामाची पाहणी केली आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्यांच्यासोबत माजी आमदार दिनकरतात्या पाटील, माजी नगरसेवक अजिंक्य पाटील, गजानन आलदर, शरद देशमुख, प्रवीण पाटील, रविंद्र बाबर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कीर्तीकुमार मिरजकर आदि अधिकारी उपस्थित होते.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.