“देवेंद्र फडणवीस मराठी राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी मराठी शाळांच्या दुरावस्थेवर काम केलं पाहिजे. राज्य भाषेला कसं बळ मिळेलं. हिंदी सक्ती करण्याच काय कारण? ज्या हिंदीसाठी फडणवीसांचा आटापीटा सुरू आहे, त्या उत्तरप्रदेश मध्ये 5 हजार हिंदी शाळा बंद पडल्यात. हजारो शाळांमध्ये हिंदी शिकवायला शिक्षक नाहीत. मोदींनी जी त्रिसुत्री काढली आहे, त्यासाठी त्यांनी काऊ बेल्टमध्ये काम करावं. महाराष्ट्र मुंबईमध्ये हिंदी शिकवायची गरज नाही” असं संजय राऊत यांनी म्हटलं. “देवेंद्र फडणवीस कुणासाठी सक्ती करत आहेत? त्यांचा उद्देश काय?. फडणवीसांनी मराठी भाषा अभिजात करावी. विचारा नरेंद्र मोदींना गुजरातमध्ये हिंदी सक्ती का केली नाही?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
“हा प्रश्न विचारायची हिम्मत आहे का, शिंदेंच्या बगलबच्चांना. तुम्हाला काय दाखवायचं आहे, महाराष्ट्रात अहवेलना करताय तुम्ही. मिटींग घेत आहेत, मराठी माणसासाठी एकतरी शिंदेंनी बैठक घेतली का?. मुंबई महापालिकेचं राजकारण करताय, कुणासाठी करताय तुम्ही, महाराष्ट्राच्या शत्रुप्रमाणे काम करू नये फडणवीसांनी. फडणवीसांना 10 साहित्यीक माहिती आहेत का?. शिंदेंना 5 साहित्यीकांची नावं माहिती आहेत का?” अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.
‘बैठका घेताय हाच मराठीचा अपमान आहे’
हिंदी सक्तीच्या मुद्यावर बोलताना संजय राऊत यांनी नाना पाटेकर, माधुरी दिक्षित, प्रशांत दामले या कलाकारांची नाव घेतली. “प्रकाशराज जसे कर्नाटकात उठले आहेत, तसे कुठे आहेत, नाना पाटेकर, माधुरी दिक्षित, प्रशांत दामले?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. “भारतीय जनता पक्षात असलेल्या सगळ्या नेत्यांची मुलं इंग्रजी शाळेत शिकत आहेत. मी अभिमानाने सांगतो माझ्या मुली मराठी शाळेत शिकल्या आहेत. साहित्यीकांची मुलं इंग्रजी शाळेत शिकत आहेत, आम्हाला शिकवू नका, बैठका घेताय हाच मराठीचा अपमान आहे, मराठीवर आक्रमण करणाऱ्यांच्या का बैठका घेताय?” अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.
‘स्वाभिमान काय असतो हे इराणने दाखवलं’
“एका देशाचा स्वाभिमान काय असतो हे इराणने दाखवलं आहे. इराण कायमच भारताची बाजू घेतो, भारत ज्या ज्यावेळी संकटात आला, त्यावेळी इराण भारतासोबत होता. इराणने जी हिम्मत दाखवली, त्यातून पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी काहीतरी शिकलं पाहिजे. ट्रम्पला इराण घाबरला नाही. पाकिस्तानसोबत आपण जिंकण्याच्या वाटेवर होतो, इराणच्या नेत्यांनी जजबा दाखवला. आपल्यावेळी ट्रम्प बोलले, आपण शांत बसलो, पण इराण शांत नाही बसला” असं संजय राऊत म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.