Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News ! अमेरिकेच्या दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार, महिला खासदाराचा मृत्यू

Breaking News ! अमेरिकेच्या दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार, महिला खासदाराचा मृत्यू
 

अमेरिकेतील मिनेसोटा राज्यातील दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार करण्यात आला आहे. यात एक महिला खासदार आणि त्यांच्या पतीचा मृत्यू झाला आहे. घरात घुसून गोळ्या घालण्यात आल्या असून संपूर्ण अमेरिकेत खळबळ माजली आहे. मेलिसा हॉर्टमॅन आणि त्यांच्या पतीचा या हल्ल्यात मृत्यू झाला असून स्टेट सीनेटर जॉन हॉफमॅन गंभीर जखमी झाले आहेत. हल्लेखोर पोलिस वेशात आला होता. गोळीबाराची घटना मिनियापोलिसच्या उपनगरांमध्ये चैम्पलिन आणि ब्रुकलिन पार्क येथे घडली. प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोराने स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे भासवत घरांमध्ये प्रवेश केला. स्थानिक प्रशासनाने हा एक टार्गेटेड हल्ला असल्याचं म्हटलं आहे.

राजकीय हिंसाचाराची भीती

"हा केवळ मिनेसोटासाठी नाही, तर संपूर्ण देशासाठी धोक्याचा इशारा आहे. कोणतीही राजकीय हिंसा सहन केली जाणार नाही आणि दोषींना कठोर शिक्षा केली जाईल, असा इशारा मिनेसोटाचे गव्हर्नर टिम वॉल्ज यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. हल्लेखोर अजूनही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्यामुळे गोळीबारानंतर दोन्ही उपनगरांतील रहिवाशांना घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मॅनिफेस्टो आणि संभाव्य यादी
मिनेसोटा पोलिसप्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताच्या गाडीतून एक "मॅनिफेस्टो" सापडले असून त्यामध्ये अनेक राज्यातील लोकप्रतिनिधींची नावे असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे हा हल्ला पूर्वनियोजित असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संशयिताची ओळख अद्याप उघड करण्यात आलेली नाही, मात्र त्याचे हेतू राजकीय असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तपास यंत्रणांकडून या घटनेमागे एखादं मोठं कटकारस्थान असण्याची शक्यता तपासली जात आहे.. सध्या एफबीआय, स्थानिक पोलिस आणि इतर संघीय एजन्सी संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत आहेत. राज्यातील इतर जनप्रतिनिधींना देखील तात्काळ अतिरिक्त सुरक्षा पुरवली जात आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.