Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News! शिक्षकाचा ११ वर्षाच्या मुलीवर अश्लील व्हिडीओ दाखवत अत्याचार; आई वडिलांना मारून टाकण्याची दिली धमकी

Breaking News! शिक्षकाचा ११ वर्षाच्या मुलीवर अश्लील व्हिडीओ दाखवत अत्याचार; आई वडिलांना मारून टाकण्याची दिली धमकी
 

छत्रपती संभाजीनगर : शिक्षणाचे मंदिर समजल्या जाणाऱ्या वर्गखोल्यांमध्येच जर मुली सुरक्षित नसतील, तर पालकांनी विश्वास ठेवायचा तरी कोणावर? अशाच संतापजनक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शहरालगतच्या रांजणगाव शेनपुंजी येथील नर्सरी कॉलनीत खाजगी शिकवणी घेत असलेल्या एका शिक्षकाने चौथीत शिकणाऱ्या अकरा वर्षांच्या विद्यार्थिनीवर अश्लील व्हिडिओ दाखवत लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, हा धक्कादायक प्रकार घरी कुणाला सांगितल्यास आई-वडिलांचे तुकडे करीन, अशी धमकी पीडित मुलीला देण्यात आली होती.

शिकवणीच्या नावाखाली विकृती
आरोपी शिक्षकाचे नाव सुभाष जाधव (वय ४५) असे असून, तो गेल्या दीड वर्षांपासून रांजणगाव शेपू येथे 'टॉपर क्लासेस' या नावाने खाजगी शिकवणी चालवत होता. सुभाष जाधव हा एम.ए. इंग्रजी आणि बी.एड. शिक्षण घेतलेला असून त्याच्यासोबत आणखी दोन शिक्षक या शिकवणीत सहभागी होते. संबंधित शिकवणी नर्सरी कॉलनी परिसरात भरवली जात होती.
तिन्ही दिवसांपूर्वी नराधमाचे कृत्य
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी चौथीत शिकणाऱ्या अकरा वर्षीय विद्यार्थिनीला सुभाष जाधव याने अश्लील व्हिडिओ दाखवले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. ही संपूर्ण घटना कोणालाही सांगितल्यास तिच्या आई-वडिलांना ठार मारण्याची धमकीही आरोपीने दिली. या भीतीने घाबरून गेलेली मुलगी काही दिवस शिकवणीस जाणं टाळू लागली.

आई-वडिलांनी विचारल्यावर उघड झाला प्रकार
मुलगी शिकवणीस न जात असल्याचे लक्षात आल्यावर तिच्या पालकांनी तिला समजूतदारपणे विचारले. त्यावेळी मुलीने घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. आपल्या चिमुरडीवर घडलेला अन्याय ऐकताच आई-वडिलांसह नातेवाईकांनी संतप्त प्रतिक्रिया देत आरोपी शिक्षकाला चोप दिला.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
 
या संपूर्ण घटनेनंतर पीडित मुलीच्या पालकांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली असून, आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (POCSO Act) कठोर कारवाई केली जाणार आहे.

पोलीस तपास सुरू
वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी याप्रकरणी अधिक तपास करत असून, आरोपी सुभाष जाधव याला अटक करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने खाजगी शिकवणी केंद्रांची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.