सांगली : सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटल रोडवर एसटी बसच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वार महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सांगली शहरातील जयमातृभूमी व्यायाम मंडळासमोर सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात एसटीचे मागील चाक तरुणीच्या
डोकयावरून गेल्याने शर्वरी कुलकर्णी या महाविद्यालयीन तरुणीचा जागीच मृत्यू
झाला. घटनेनंतर अपघातस्थळी मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच
शहर पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला. अपघातात शर्वरी राजकुमार
कुलकर्णी, वय 21 वर्ष, रा. हरिपूर या महाविद्यालीय विद्यार्थिनीचा मृत्यू
झाला.
मयत शर्वरी ही सांगलीतील एका महाविद्यालयात बीसीएचे शिक्षण घेत होती. आज सकाळी ती नेहमीप्रमाणे महाविद्यालयाकडे जात असताना सिव्हिल रोडवर मुंबई जमखंडी बसला तिची दुचाकीची घासली. यामध्ये मागील चाकाखाली सापडून तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर काही अंतरावर जाऊन बस थांबली. घटनेनंतर शर्वरी हिचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेने परिसरातील हळहळ व्यक्त केली जात आहे. दुर्दैवी शर्वरी हिचे वडील वारले आहेत. तिची आई आणि बहिणीसोबत ती हरिपूर येथे राहत होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.