Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'वासनाकांड'प्रकरणावरून IPS जालिंदर सुपेकरांविरोधात निघाला होता मोर्चा, 25 वर्षांपूर्वी काय घडलं होतं?

'वासनाकांड'प्रकरणावरून IPS जालिंदर सुपेकरांविरोधात निघाला होता मोर्चा, 25 वर्षांपूर्वी काय घडलं होतं?
 

सातारा :- वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर चर्चेच आलेले IPS अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्याबाबत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. अंजली दमानिया, विजय कुंभार यांच्यासर सुषमा अंधारे यांनी जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जालिंदर सुपेकर यांच्या IPS कारकीर्दीच्या सुरुवातीलाच ते अडचणी सापडले होते. जालिंदर सुपेकर यांच्याविरोधात 2000 साली मोर्चा निघाला होता. जालिंदर सुपेकर हे त्या काळात सातारा येथे उपविभागीय पोलिस अधिकारी  म्हणून कार्यरत होते. त्याच सुमारास "हिरवा शालू" नावाचा एक चित्रपट साताऱ्यात तयार होणार असल्याची चर्चा सुरू झाली. या चित्रपटासाठी नटींची निवड होणार असल्याची बातमी पसरली आणि अनेक मुली संबंधितांशी संपर्क साधला. काही मुलींनी आपली माहिती, फोटो वगैरे संबंधितांकडे जमा केले. त्यानंतर काही मुलींना रानावनात नेऊन 'कास्टिंग'च्या नावाखाली भेटी घेतल्या गेल्याचं समोर आले.


या प्रक्रियेचा काही उच्चभ्रू लोकांनी गैरफायदा घेतला आणि काही मुलींना आपल्या जाळ्यात ओढल्याचं उघडकीस आलं. या प्रकरणाची चर्चा झाल्यानंतर "हिरवा शालू" चित्रपटाबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. या संपूर्ण प्रकाराची माहिती सातारा शहर पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली. प्रारंभी शहर पोलिसांनी तपास सुरू केला. पण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तपासाची सूत्रे तत्कालीन सातारा पोलीस उपअधीक्षक जालिंदर सुपेकर यांच्याकडे सोपवण्यात आली.

तपासाच्या नावाखाली अनेक उच्चभ्रू व्यक्तींना सुपेकर यांच्या कार्यालयात (जिल्हा परिषदेच्या शेजारी) बोलावले गेले. रात्री-अपरात्रीही काहींची चौकशी झाली. त्यामुळे अनेक लोक भयभीत झाले. या प्रकरणाला 'वासनाकांड' असे नाव दिले गेले. या प्रकरणामुळे साताऱ्याच्या अस्मितेला धक्का लागत आहे, अशा भावना व्यक्त करत सर्वपक्षीय सातारकरांनी रस्त्यावर उतरत पोलीस उपअधीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या विरोधात मोर्चा काढला आणि प्रकरणाचा निषेध व्यक्त केला.

काही दिवसांनी हे प्रकरण निवळले. मात्र या काळात काही उच्चभ्रू लोकांनी पोलिसांकडे पैसे देऊन प्रकरण मिटवल्याची कुजबूज सुरू होती. शेवटी, ज्यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले होते, त्या सर्वांना न्यायालयाने निर्दोष घोषित करत सुटका केली. मात्र या प्रकरणामुळे जालिंदर सुपेकर यांचं नाव सातारकरांना पुन्हा आठवलं आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.