RBI कडून खुशखबर! होम लोन स्वस्त होणार, रेपो रेट मध्ये पुन्हा कपात
झर्व्ह बँक ऑफ इंडियाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात केली आहे. सलग तिसऱ्यांदा ही कपात करण्यात आली आहे. ५० बेसिस पॉइंट्सने ही कपात केली आहे. यामुळे सर्वसामान्यांना मात्र दिलासा मिळणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे होम लोन, कार लोन स्वस्त होणार आहे. त्यामुळे कर्जदारांना दिलासा मिळणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही घोषणा केली आहे. पतधोरण बैठकीत रेपो रेटबाबत निर्णय घेण्यात आला आहे. याआधीही दोनदा रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली आहे. रेपो रेटमध्ये ५ बेसिस पॉइंट्सने कपात केली होती. याआधी रेपो रेट ६ टक्के होता. आता ५० बेसिस पॉइंट्सने कपात केल्यानंतर रेपो रेट ५.५ टक्के झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेपो रेटमध्ये कपात करत आहे. पतधोरण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
रेपो रेट म्हणजे नक्की काय? (What Is Repo Rate)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेपो रेट निश्चित करते. या रेपो रेटवरच आधारित प्रत्येक बँक आपल्या कर्जाचे व्याजदर ठरवते. सर्व बँकांना या रेपो रेटचं पालन करावे लागते. त्यानुसारच त्यांना कर्जावरील व्याजदर ठरवता येतो. जर रेपो रेट कमी झाला तर कर्जावरील व्याजदरदेखील कमी होणार आहे. जर रेपो रेटमध्ये वाढ झाली तर कर्जावरील हप्ता वाढतो. म्हणजेच व्याजदर वाढते.
कर्जाचा हप्ता कमी होणार (Loan EMI Will Decrease)
रिझर्व्ह बँकेने याआधी पतधोरण बैठकीत रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉइंट्सने कपात केली होती. आता ५० बेसिस पॉइंट्सने ही कपात केली आहे.जर तुम्ही २० लाखांचे लोन घेतले असेल तर त्याच्या व्याजदरात कपात होणार आहे. जर तुम्ही हे लोन २० वर्षांसाठी ९ टक्के व्याजाने घेतले असेल तर सध्या त्याचा हप्ता १७,९९५ रुपये असेल. आता रेपो रेटमध्ये कपात झाल्यानंतर हा हप्ता १७,३५६ रुपये होईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.