Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) च्या ऐतिहासिक IPL विजयानंतर चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू, 20 जखमींपैकी 10 गंभीर

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) च्या ऐतिहासिक IPL विजयानंतर  चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू, 20 जखमींपैकी 10 गंभीर
 


बंगळुरु: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) च्या ऐतिहासिक IPL विजयानंतर येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या विजयोत्सवात चाहत्यांमध्ये मोठी चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत किमान 11 जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत.  दरम्यान, जखमींची संख्या मोठी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

हजारो चाहत्यांची एकच झुंबड

RCB चा IPL 2025 मधील पहिला विजेतेपद साजरं करण्यासाठी आज संध्याकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत स्टेडियममध्ये सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी हजारो चाहत्यांनी स्टेडियमबाहेर गर्दी केली होती. टीमचे एक झलक पाहण्यासाठी झालेल्या धक्काबुक्कीत गेटवर चेंगराचेंगरी झाली.

अपघात Bowring रुग्णालयात हलवले

जखमी आणि मृतांना तत्काळ बॉवरिंग रुग्णालयात नेण्यात आलं. यामध्ये काहींना गंभीर दुखापती झाल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं आहे. मृतांमध्ये एका महिलेसह दोन युवकांचा समावेश असल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे.

पोलिसांनी याआधीच दिला होता इशारा

बेंगळुरु पोलिसांनी आज सकाळीच एक वाहतूक आणि गर्दी नियंत्रणावरील advisory जाहीर केली होती. त्यात त्यांनी दुपारी ३ ते रात्री ८ या वेळेत विधानसौधा आणि स्टेडियम परिसर टाळण्याचं आवाहन केलं होतं. याशिवाय, पोलिसांनी स्पष्ट केलं होतं की कोणतीही विजय मिरवणूक होणार नाही आणि साजरा केवळ स्टेडियममध्येच मर्यादित राहील.

प्रशासनाकडून चौकशीचे आदेश

या अपघातानंतर राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनाकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अशा प्रसंगी पुरेशी सुरक्षा आणि गर्दी नियंत्रणाची उपाययोजना करण्यात आली होती का, याची तपासणी केली जाणार आहे.

चाहत्यांचा जल्लोष दु:खात बदलला

RCB च्या ऐतिहासिक विजयाचं उत्सवमय वातावरण एका क्षणात हळव्या आणि हृदयद्रावक वळणावर आलं. सोशल मीडियावरही चाहत्यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबियांसाठी संवेदना व्यक्त केल्या जात आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.