Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

RCB जिंकल्यामुळे विजय मल्ल्याचं सगळं कर्ज माफ होणार?; कोण देणार पैसे?

RCB जिंकल्यामुळे विजय मल्ल्याचं सगळं कर्ज माफ होणार?; कोण देणार पैसे?



रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ आयपीएलच्या १८ व्या मोसमात पहिल्यांदाच आयपीएलचा चॅम्पियन बनला आहे. २००८ ते २०२४ पर्यंत संघ तीन वेळा अंतिम फेरीत पोहोचला, पण एकदाही विजेतेपद जिंकू शकला नाही. मात्र यावेळी आरसीबीने आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्जचा पराभव करून पहिल्यांदाच ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. देशभरातून क्रिकेटप्रेमींकडून विराट कोहली आणि त्याच्या संघावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. दुसरीकडे, संघाचे माजी मालक आणि फरार उद्योगपती विजय मल्ल्या आणि त्याच्या मुलाची प्रतिक्रिया समोर आली आहे. १८ वर्षांनी स्वप्न पूर्ण झाल्याचे विजय माल्या यांनी म्हटलं आहे.

 

आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पहिल्या विजयानंतर माजी संघ मालक विजय मल्ल्याने आनंद व्यक्त केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर प्रतिक्रिया देताना त्यांनी, आरसीबी अखेर १८ वर्षांनी आयपीएल चॅम्पियन बनला आहे असं म्हटलं. अंतिम रोमांचक सामन्यात पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करून आरसीबीचा संघ आयपीएलचा पहिल्यांदा विजेता बनला. "अखेर १८ वर्षानंतर आरसीबीच्या संघाने आयपीएलचं जेतेपद पटकावलं. २०२५ च्या संपूर्ण स्पर्धेतील संघाची कामगिरी उत्तम राहिली. उत्तम कोचिंग आणि सपोर्ट स्टाफसह योग्य समतोल असलेला संघ छान खेळला. खूप खूप अभिनंदन। ई साला कप नामदे (या वर्षी कप आपण जिंकलो)!!," असं विजय माल्याने म्हटलं.

"जेव्हा मी आरसीबीची स्थापना केली तेव्हा माझे स्वप्न होते की आयपीएलची ट्रॉफी बंगळुरुमध्ये यावी. मला तरुण वयातील दिग्गज किंग कोहलीची निवड करण्याची संधी मिळाली आणि तो १८ वर्षे आरसीबीसोबत राहिला हे उल्लेखनीय आहे. मला युनिव्हर्स बॉस म्हणून ख्रिस गेल आणि आरसीबीच्या इतिहासाचा अविभाज्य भाग असलेल्या मिस्टर ३६० एबी डिव्हिलियर्सची निवड करण्याचा मान मिळाला. शेवटी, आयपीएल ट्रॉफी बंगळुरूमध्ये आली. माझे स्वप्न साकार करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन आणि पुन्हा एकदा आभार. आरसीबीचे चाहते सर्वोत्तम आहेत आणि ते आयपीएल ट्रॉफीसाठी पात्र आहेत. ई साला कप बंगळुरू बरुटे।" असंही माल्या म्हणाला.

दुसरीकडे, सिद्धार्थ मल्ल्यानेही त्याच्या इंस्टाग्रामवर आरसीबी चॅम्पियन बनल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.. या व्हिडिओमध्ये शशांक सिंग शेवटच्या चेंडूवर षटकार मारतो आणि विराट कोहली जमिनीवर चेहरा ठेवून रडत आहे. सिद्धार्थ मल्ल्याचाही आनंद थांबत नाही. सिद्धार्थने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये, "१८ वर्षांनंतर ट्रॉफी जिंकली. मला काय बोलावे ते कळत नाही," असं म्हटलं. 


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.