Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बँकेतील ५२ किलो सोन्यावर डल्ला, घटनास्थळी काळी बाहुली ठेवली, देशातील सर्वात मोठ्या सोन्याच्या चोरीमुळे खळबळ

बँकेतील ५२ किलो सोन्यावर डल्ला, घटनास्थळी काळी बाहुली ठेवली, देशातील सर्वात मोठ्या सोन्याच्या चोरीमुळे खळबळ

 
कर्नाटकमधील विजयपुरा जिल्ह्यातील एका बँकेमधून ५२ किलो सोन्याची चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. ही चोरी देशातील सर्वात मोठ्या चोरीच्या घटनेपैकी एक घटना ठरली आहे. चोरट्यांनी कॅनरा बँकेतील शाखेमधून सोन्याची चोरी केली. ही घटना मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात घडली. मात्र या प्रकरणी एकाही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेलं नाही. पोलिसांकडून या प्रकरणी कसून तपास सुरू आहे.

 
याबाबत पोलिसांनी सांगितले की, ही चोरी विजयपुरा जिल्ह्यातील मनगुली येथीलल कॅनरा बँकेच्या शाखेमध्ये २३ मे रोजी झाली होती. मात्र ही चोरी २६ मे रोजी बँकेचे कर्मचारी कामावर परतले तेव्हा उघडकीस आली. चोरट्यांनी ५२ किलो सोन्याचे दागिने लंपास केले. मात्र या चोरट्यांनी दागिन्यांवर नेमका डल्ला कसा काय मारला हे पोलिसांनी आतापर्यंत समजू शकलेलं नाही.
विजयपुराचे एसपी लक्ष्मण निंबर्दी यांनी सांगितले की, सोन्याचे दागिने हे २३ मे रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून २५ मे रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या दरम्यान, चोरण्यात आले होते. आम्ही आरोपींना पकडण्यासाठी आठ पथके तयार केली आहेत. तसेच या गुन्ह्यामध्ये ६ ते ८ लोक सहभागी असल्याचा आम्हाला संशय आहे. तर आणखी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही चोरी आदीपासून निश्चित होती. चोरट्यांनी चोरी करण्यासाठी एका लाँग विकेंडची वाट पाहिली. त्यानंतर चोरट्यांनी बँकेतील सोन्यावर डल्ला मारला.

पोलीस अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, चोरट्यांनी बँकेत प्रवेश करण्यासाठी बनावट चावीचा वापर केला. त्यांनी अलार्म बंद केला. तसेच त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा बंद केले. तसेच चोरटे बँकेतील नेटवर्क व्हिडीओ रेकॉर्डरसुद्धा घेऊन गेले. त्यांनी केवळ बँक लॉकर उघडले आणि त्यातील सोनं घेऊन गेले. आश्चर्याची बाब म्हणजे चोरी केल्यानंतर चोरट्यांनी घटनास्थळी एक काळ्या रंगाली बाहुली ठेवली, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, कर्नाटकमध्ये सोन्याच्या चोरीसाठी याआधीही बँकांना लक्ष्य केले गेले आहे. गतवर्षी २८ ऑक्टोबर रोजी एका टोळीने दावणगेरे जिल्ह्यातील न्यामती शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमधून १३ कोटी रुपयांचे दागिने चोरले होते. 


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.