आजकाल वाढत्या तंत्रज्ञांमुळे तुम्हाला लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांच्या हातात स्मार्टफोन पाहायला मिळतील. प्रत्येक स्मार्टफोनमध्ये काही वेगळे फीचर्स असतात. तर प्रत्येक स्मार्टफोनमध्ये एअरप्लेन मोड असतोच. तर या एअरप्लेन मोडबद्दल बोलायचे झाले तर आजही अनेकांना वाटते की हा मोड फक्त विमान प्रवासादरम्यानच उपयुक्त आहे, परंतु तुम्हाला माहिती आहे का की हा मोड तुमच्या दैनंदिन जीवनातही मोठी कामे सोपी करू शकतो.
हा मोड डिव्हाइसचे सर्व वायरलेस कनेक्शन जसे की नेटवर्क, वाय-फाय आणि ब्लूटूथ तात्पुरते बंद करतो. यामुळे बॅटरीचा वापर कमी होतोच, पण त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. आज आम्ही तुम्हाला या एअरप्लेन मोडचे असे 5 स्मार्ट वापर सांगणार आहोत, ज्याबद्दल आजही 100 पैकी 80 लोकांना माहिती नाही…
मोबाईल लवकर चार्ज होईल
जर तुमचे डिव्हाइस खूप हळू चार्ज होत असेल तर हा मोड तुम्हाला खूप मदत करू शकतो. जर तुम्हाला तुमचे डिव्हाइस जलद चार्ज करायचे असेल तर चार्जिंग दरम्यान फोनचा एअरप्लेन मोड चालू ठेवा. असे केल्याने, बॅकग्राउंडमध्ये चालू असलेली नेटवर्क अॅक्टिव्हिटी पूर्णपणे बंद होईल. यामुळे फोनचा चार्जिंग स्पीड देखील वाढेल.
बॅटरी देखील वाचवेल
जर तुम्ही अशा भागात असाल जिथे नेटवर्क कमी असेल, तर फोन सतत सिग्नल सर्च करत राहतो, ज्यामुळे बॅटरी लवकर संपू लागते. तथापि अशा परिस्थितीतही तुम्ही एअरप्लेन मोड चालू करून बॅटरी वाचवू शकता.
लक्ष केंद्रित करण्यास मदत करते
फोन मध्ये येणाऱ्या सततच्या नोटिफिकेशनमुळे तुम्ही काही महत्त्वाचे काम करत असाल किंवा अभ्यास करताना लक्ष केंद्रित होत नाही. तर अशावेळेस तुम्ही एअरप्लेन मोड वापरू शकता. कधीकधी नोटिफिकेशन्स तुमचे लक्ष विचलित करतात. अशा परिस्थितीत एअरप्लेन मोड देखील तुम्हाला खूप मदत करू शकतो. एकदा तुम्ही ते चालू केले की, तुम्हाला कोणताही कॉल येणार नाही किंवा कोणताही मेसेज तुम्हाला त्रास देणार नाही.
तुमच्या मुलांना इंटरनेटपासून दूर ठेवते
जर तुम्हाला तुमच्या मुलांना तुमच्या फोनवर गेम खेळताना इंटरनेटपासून दूर ठेवायचे असेल तर तुम्ही त्यांना फोन देण्यापूर्वी एअरप्लेन मोड चालू करू शकता. असेही आढळून आले आहे की काही गेम खेळताना इंटरनेट बंद असल्यास त्यांच्यामध्ये जाहिराती देखील कमी दिसतात.
फोनला जास्त गरम होण्यापासून वाचवा
कधीकधी खराब सिग्नल किंवा जड कामांमुळे फोन गरम होतो. अशा वेळेस एअरप्लेन मोड चालू करून तुम्ही प्रोसेसरवरील भार कमी करू शकता आणि तुमचे डिव्हाइस थंड राहील.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.