Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शिक्षक होण्याचा दर फुटला, 15 ते 18 लाख 'प्लस'? पैशांच्या मागणीनं उमेदवारांमध्ये नैराश्य

शिक्षक होण्याचा दर फुटला, 15 ते 18 लाख 'प्लस'? पैशांच्या मागणीनं उमेदवारांमध्ये नैराश्य
 

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रियेच्या मुलाखती सुरू आहेत. यामध्ये काही अनुदानित संस्थाचालकांनी उमेदवारांची आर्थिक मागणी होत असल्याचे प्रकार समोर आले आहे. भरतीसाठी तब्बल 10, 15 ते 18 लाख 'प्लस'पर्यंत भाव फुटल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेतील या प्रकाराने उमेदवार हैराण असून, दाद मागायची तरी कोणाकडे, या विवंचनेत आहे.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसह अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या दुसऱ्या टप्प्यातील भरती सुरू आहे. यात उमेदवारांचं आर्थिक छळवणूक सुरू असल्याचे प्रकार समोर येत आहेत. मुलाखतीदरम्यान लाखो रुपयांची मागणी केली जात असल्याने, उमेदवार नैराश्यात जात आहे. यामुळे शिक्षक भरतीच्या मुलाखतीबाबत सर्व प्रक्रिया मूल्यमापनसुद्धा इन कॅमेरा होणे आवश्यक आहे, अशी मागणी पुरोगामी शिक्षक संघटनेनी केली आहे.
 

 

काही संस्थाचालकांनी गुणवत्तेच्या आधारे समोर आलेल्या उमेदवारांना कोणतीही तक्रार न करता आपल्याकडे मुलाखत घेऊन रुजू करून घेत असले, तरी अशा संस्था बोटावर मोजण्या इतक्याच आहेत, असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे संस्थाचालकांना देण्यात आलेल्या मुलाखतीचे सर्व अधिकार काढून घ्यावेत, अशी मागणी होत आहे.

राज्यात शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू असून त्यात शिक्षकांच्या 8 हजार 556 रिक्तपदांची भरती केली जात आहे. पवित्र पोर्टलच्या प्रमाणित कार्यपद्धतीनुसार, मुलाखतींचे छायाचित्रण करणे अपेक्षित आहे. मुलाखत, वर्ग निरीक्षण आणि विद्यार्थी गुणसंख्येला प्रत्येकी दहा गुण दिले जाणार आहेत. या सर्व प्रक्रियेवर राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी, शिक्षक अभियोग्यता चाचणी झाल्यानंतर या संस्थेमध्ये पात्र उमेदवाराला पाठवले जाते, त्याची मुलाखत इन कॅमेरा झाली पाहिजे. त्यातून योग्य उमेदवारांची निवड होईल, असे सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.