सांगली : येथील काळ्या खणीच्या सुशोभीकरणाचे काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश महापालिकेचे आयुक्तसत्यम गांधी यांनी दिले. 15 ऑगस्टपर्यंत संगीत कारंजे आणि लेसर शो कार्यान्वित करण्यास सांगितले. दरम्यान, वारणाली मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे कामही गतीने पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्त गांधी यांनी दिल्या.
आयुक्त सत्यम गांधी यांनी मंगळवारी काळी खण, वारणाली मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, चैत्रबन नाला, माळबंगला, हनुमाननगर येथील अग्निशमन केंद्राचे बांधकाम, मिरज येथे ई-बस चार्जिंग स्टेशनच्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. वैभव पाटील, विद्युत विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता अमरसिंह चव्हाण, तसेच बांधकाम विभागाचे शाखा अभियंता महेश मदने व अधिकारी उपस्थित होते. वारणाली मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या पाहणीवेळी माजी नगरसेवक विष्णू माने उपस्थित होते.काळी खण सुशोभीकरणाचे काम 3.75 कोटी रुपये मंजूर निधीतून सुरू आहे. याठिकाणी 1 कोटी रुपये खर्चून संगीत कारंजा, तर 50 लाख रुपये खर्चून लेसर शो कार्यान्वित होणार आहे. फूड पार्क उभारणी, रोषणाई, सुशोभीकरण यावर 1.50 कोटी रुपये खर्च होत आहेत. आयुक्तगांधी यांनी या कामाला भेट दिली. हे काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. संगीत कारंजा, लेसर शो 15 ऑगस्टपर्यंत कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.