Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :-विटा पालिकेचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान

सांगली :- विटा पालिकेचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान
 

विटा : 'स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५' मध्ये विटा पालिके ने२० हजार ते ५० हजार लोकसंख्येच्या गटात देशात अव्वल स्थान पटकावले. आज गुरुवारी नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील, उपमुख्याधिकारी स्वप्निल खामकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राज्याच्या नागर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, केंद्रीय गृहनिर्माण नगरविकास मंत्री मनोहर लाल तसेच राज्यमंत्री तोखन साहू प्रमुख उपस्थित होते.

विटा शहराच्या सातत्यपूर्ण स्वच्छता कार्याचा राष्ट्रीय स्तरावर करण्याची ही तिसरी वेळ आहे. शहरी गृहनिर्माण व विकास मंत्रालयाने यावर्षी 'स्वच्छ सर्वेक्षण २०२४' करिता गुणांकन पध्दती बदलली. 'सुपर स्वच्छ लीग' ही नवीन विशेष श्रेणी निर्माण केली. 'स्वच्छ सर्वेक्षण २०२३' पर्यंत जी शहरे सलग तीन वर्षे नंबरात आहेत, अशा शहरांसाठी 'सुपर स्वच्छ लीग' ही विशेष श्रेणी होती. यांत २० हजार ते ५० हजार लोक संख्या गटात विटा शहराने सुपर स्वच्छ मानां कन मिळवले आणि देशभरात प्रथम क्रमांक पटकावला. यासोबतच कचरामुक्त शहराचे पंचतारांकित (फाईव्ह स्टार) मानांकन' तसेच हागणदारी मुक्त कॅटेगरीमध्ये ओ डी एफ प्लस प्लस प्लस मानांकनही विटा शहराने कायम राखले.

प्रशासक डॉ. विक्रमसिंह बांदल यांनी या यशाचे श्रेय सर्व लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी व कर्मचारी, शहर स्वच्छ ठेवण्या करिता अहोरात्र झटणारे स्वच्छतामित्र, सामाजिक संस्था, महिला बचत गट, पत्रकार, तरुण मंडळे, सर्व शाळा महाविद्यालय शिक्षक व विद्यार्थी, स्वच्छ ताप्रेमी विटेकर, विविध क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था व असोसिएशन, उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक, सर्व कंत्राटदार अशा सर्व घटकां ना दिले.विटा शहराचा समावेश स्वच्छतेत सातत्य राखणाऱ्या देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहरांच्या 'सुपर स्वच्छ लीग' मध्ये होणे ही प्रत्येक विटेकर नागरिकासाठी अत्यंत अभिमा नाची गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी दिली केली. या कार्यक्रमप्रसंगी स्वच्छता निरीक्षक नारायण शितोळे, वाहन व्यवस्थापक आनंदा सावंत, नितीन टकले, अनिल पवार, अर्जुन सूर्यवंशी, दीपक सातपुते हेदेखील उपस्थित होते.

विटा पालिकेची स्वच्छतेतील सातत्यपूर्ण कामगिरी

विटा पालिकेने नेहमीच नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक असे स्वच्छता उपक्रम राबवित इतर शहरांसाठी एक मापदंड प्रस्थापित करून दिला आहे. 'स्वच्छ सर्वेक्षण २०२४' ला सामोरे जाताना 'सुपर स्वच्छ लीग' मध्ये समावेशासाठी ८५ टक्केपेक्षा अधिक गुण राखणे अनिवार्य होते. त्यातही विटा पालिकेने लोकसहभागावर भर देत अनेक उल्लेखनीय प्रकल्प राबवले.

निर्मितीच्या ठिकाणीच ओला, सुका व घरगुती घातक व सॅनिटरी कचरा अशा प्रकारे कचरा वर्गीकरण, कचरा संकलन आणि वाहतुकी साठी सर्व घंटागाड्यांचे रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि मार्ग निरीक्षण व नियंत्रणासाठी जीपीएस प्रणाली, शहरात व्यापारी भागामध्ये ठिकठिका णी क्लॉथ वेंडिंग मशीन आणि प्लास्टिक बॉटल क्रशिंग मशीन, घनकचरा व्यवस्थापन भूमी येथे देखील कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून घनकचरा व्यवस्थापन असे अनेक उप क्रम राबवले. घनकचरा व सांडपाणी व्यवस्था पनासाठी अत्याधुनिक कार्यप्रणालींचा वापर करून तसेच स्वच्छताविषयक नानाविध उपक्रम राबवले. देशव्यापी स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल स्थान मिळविण्यासाठी विटा शहर गेल्या चार वर्षांपासून आघाडीवर राहिले आहे. स्वच्छताविषयक सातत्यपूर्ण जनजागृतीपर उपक्रम आयोजनातून शहरात स्वच्छतेची चळवळ उभी राहिली. त्यामुळेच विटा शहराला पुन्हा अव्वल स्थान मिळालेले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.