राजकीय वर्तुळातून आताची सर्वात मोठी घडामोड घडली असून आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस एकाच हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळतेय. बीकेसीतील सोफिटेल हॉटेलमध्ये ही भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. फडणवीस-ठाकरेंच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलंय. दोन्ही नेते सोफिटेल हॉटेलच्या 7 व्या मजल्यावर भेटल्याची माहिती मिळतेय.
आदित्य ठाकरे संध्याकाळी 5.30 ते 6 च्या सुमारास हॉटेल सोफिटेलमध्ये दाखल झाले. त्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील पोहोचल्याची माहिती मिळतेय.या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अडीच तास चर्चा झाली असून काहीतरी पडद्यामागे घडते आहे. गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. भाजप कुठेतरी शिंदेंना डॅमेज करण्याचा प्रयत्न करतेय अशी देखील महिती सूत्रांनी दिली होती. तसेच आज झालेल्या भेटीने शिंदेंच्या अडचणी वाढणार का? असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.