केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी डिजिटल इंडिया मोहिमेला यंदा १० वर्षे पूर्ण झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाल्यानंतर, १ जुलै २०१५ रोजी डिजिटल इंडिया कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. देशात डिजिटल क्रांती घडवणाऱ्या या उपक्रमाच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त सरकारने नागरिकांसाठी खास स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचे नाव आहे 'डिजिटल इंडियाचा दशक - रील स्पर्धा'.
देशभरातील नागरिकांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून, डिजिटल इंडियामुळे त्यांच्या जीवनात घडलेल्या सकारात्मक बदलांची रील तयार करून ती शेअर करण्याची संधी यामधून दिली जात आहे.
स्पर्धेतील बक्षिसांची रक्कम अशी असेल
टॉप १० विजेते - प्रत्येकी १५,००० रुपये
पुढील २५ विजेते - प्रत्येकी १०,००० रुपये
पुढील ५० विजेते - प्रत्येकी ५,००० रुपये
रील कशी असावी? - महत्त्वाच्या अटी
रील किमान १ मिनिटाची असावी.
ती पूर्णपणे मूळ (Original) असावी आणि यापूर्वी कोणत्याही सोशल मीडियावर अपलोड केलेली नसावी.
हिंदी, इंग्रजी किंवा कोणत्याही स्थानिक भाषेत बनवलेली असू शकते.
रील पोर्ट्रेट मोडमध्ये आणि MP4 फॉरमॅटमध्ये असावी.
रीलचा विषय काय असावा?
डिजिटल इंडियामुळे तुमच्या जीवनात घडलेला बदल.ऑनलाइन सरकारी सेवा, डिजिटल शिक्षण, हेल्थकेअर सुविधा, आर्थिक सक्षमीकरण यामुळे नागरिकांना झालेला लाभ.डिजिटल तंत्रज्ञानाने नागरिकांना कसे सक्षम केले, याचा अनुभव.स्पर्धेशी संबंधित अधिक माहितीसाठी भेट द्याhttps://www.mygov.in/task/decade-digital-india-reel-contest/
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.