Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

फक्त 5 रूपयांत सडलेलं लिव्हर व खराब किडनी करू शकता ठीक, डॉक्टर निशांत गुप्तांनी सांगितलेले हे 2 पदार्थ घोटून प्या

फक्त 5 रूपयांत सडलेलं लिव्हर व खराब किडनी करू शकता ठीक, डॉक्टर निशांत गुप्तांनी सांगितलेले हे 2 पदार्थ घोटून प्या
 

जर तुम्हाला फॅटी लिव्हर, खराब किडनीची समस्या असेल किंवा हृदयाची साईज वाढली असेल तर त्यावर आयुर्वेद हा एकमेव उपाय आहे. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी घरी औषध कसे बनवायचे हे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त ५ रुपये लागतील.  फक्त औषध घेतल्याने आजार बरे होतात का? तर नाही! कारण शरीरातील काही गंभीर समस्या औषधांच्या पलिकडच्या असतात. मग अशा वेळी नुसती टॅबलेट घेऊन उपयोग होत नाही, तर आपल्या आयुष्यातील काही चुका बदलाव्या लागतात. सध्या असेच काही अनुभव लिव्हर आणि किडनीच्या त्रासांबाबत लोक घेत आहेत. लिव्हर वाढल्याची किंवा किडनी कमजोर झाल्याची तक्रार करणारे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. काही वेळा डॉक्टरांनी सांगितलेली औषधे चालू असूनही अपेक्षित आराम मिळत नाही. मग प्रश्न उभा राहतो की मग उपाय काय?

अशावेळी अनेक जण आयुर्वेदाकडे वळतात. आणि हो, कधीकधी हे पारंपरिक उपाय अधिक प्रभावी ठरतात. प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. निशांत गुप्ता यांनी नुकताच असा एक घरगुती उपाय सांगितला आहे, जो अगदी ५ रुपयांत तयार होतो आणि लिव्हर-किडनी दोन्हींसाठी वरदान ठरतो. या उपायामागील शास्त्र, बनवण्याची प्रक्रिया आणि योग्य वापर कसा करावा, हे समजून घेतले तर आरोग्य सुधारायला वेळ लागणार नाही.लिव्हर व किडनीचे वाढलेले साइज कमी करण्यासाठी प्रभावी उपाय 
 
डॉ. गुप्तांच्या म्हणण्यानुसार अनेक वेळा एलोपॅथी औषधांनीही लिव्हर किंवा किडनीच्या वाढलेल्या साईजवर प्रभाव पडत नाही. शरीरात वाढणारा कफ दोष या त्रासाचे मुख्य कारण असतो. हा दोष शरीरात साठत राहतो आणि इतर कोणत्याही पद्धतीने बाहेर पडत नाही. अशा वेळी त्याला बाहेर काढण्यासाठी आयुर्वेदिक दृष्टिकोन गरजेचा ठरतो. डॉ. गुप्ता यांनी सांगितलेला हा उपाय शरीरात जमा झालेला कफ कमी करतो आणि नैसर्गिक पद्धतीने लिव्हर-किडनीचा साईज नियंत्रित करण्यास मदत करतो.

फक्त ५ रुपयांत तयार होणारं घरगुती आयुर्वेदिक औषध

या औषधासाठी तुम्हाला लागतील अगदी सहज मिळणाऱ्या गोष्टी! १५ ते २० ताजी तुळशीची पानं, आणि ४ ते ५ काळी मिरी. या दोन्ही घटकांना खलबत्त्यात किंवा पाट्यावर चांगले वाटून घ्यायचे. त्याची एक जरा जाडसर चटणी तयार झाली की, ती एका स्वच्छ सूती कपड्यात ठेवून त्या कपड्याला कोमट पाण्यात बुडवून चांगले निचोडून घ्यायचे. त्याने तयार झालेला अर्क म्हणजेच तुमचे औषध. हे औषध शरीरातील दोष शमवण्याचे काम करते.

कसा आणि कधी घ्यायचा हा उपाय?
हे औषध जेवण झाल्यावर सुमारे १ तासाने घ्यायचे. दिवसातून ३ ते ४ वेळा याचा वापर करायचा आहे. औषध घेतल्यानंतर, त्याच दिवशी सकाळी आणि संध्याकाळी शिलाजीतचे १२५ ते २०० एमजीचे एक कॅप्सूल घ्यायचे आहे. हे दोन्ही उपाय एकत्र केल्यास शरीरातील जमा कफ वितळतो, पचन सुधारते आणि लिव्हर-किडनीवरील अतिरिक्त दाब कमी होतो. परिणामस्वरूप लक्षणे हळूहळू कमी होऊ लागतात.
एक उपाय, अनेक फायदे

हा उपाय फॅटी लिव्हर असणाऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरतो. विशेष म्हणजे ज्या रुग्णांवर एलोपॅथी औषधांचा परिणाम होत नाही, त्यांनी हा उपाय अवश्य करून पाहावा. यामुळे किडनी व हार्टच्या आजारांमध्ये सूज आल्यास तीही कमी होण्यास मदत होते. शारीरिक शक्तीही पूर्ववत होते. डॉ. गुप्ता यांच्या मते, योग्य वेळी उपाय केल्यास अनेक मोठ्या शस्त्रक्रियांपासून बचाव होऊ शकतो.

फॅटी लिव्हर व खराब किडनीसाठी औषध​
औषधासोबतच हव्या आरोग्यदायी सवयी आणि संयम जरी हा उपाय प्रभावी असला तरी तो एकट्याने पुरेसा नाही. तुमचे आहार, दिनचर्या, आणि मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. जास्त तेलकट, मसालेदार अन्न, व्यसन, आणि रात्रीचे जागरण टाळणे गरजेचे आहे. तसेच दररोज किमान ३० मिनिटे चालणे, योगासने करणे आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. अशा प्रकारे फक्त ५ रुपयांत तयार होणाऱ्या या साध्या उपायातून लिव्हर आणि किडनीच्या गंभीर समस्या टाळता येतात. आजार जास्त होण्याआधीच जर आपण हे उपाय सुरू केले, तर आरोग्य टिकवणे नक्कीच शक्य आहे.

टिप : हा लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. हा वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचारांचा पर्याय नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लेखातील माहितीची अचूकता, विश्वासार्हता किंवा परिणामकारकतेची जबाबदारी सांगली दर्पण घेत नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.