Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

म्हाडाचा बंपर धमाका! फक्त 5 लाखांत महानगरात मिळणार हक्काचं घर, असा करा अर्ज

म्हाडाचा बंपर धमाका! फक्त 5 लाखांत महानगरात मिळणार हक्काचं घर, असा करा अर्ज


सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. म्हाडाने नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागांसाठी स्वस्त दरात घरांची गृहनिर्माण लॉटरी जाहीर केली आहे. या योजनेमुळे अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांचे हक्काचे घराचे स्वप्न आता साकार होणार आहे.

विशेष म्हणजे काही घरांची किंमत केवळ ५ लाख रुपये आहे.

या लॉटरीअंतर्गत छत्रपती संभाजीनगरमध्ये १३५१ आणि नाशिक विभागात १४८५ घरांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज प्रक्रिया ३० जूनपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ ऑगस्ट २०२५ आहे. अर्ज https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भरता येणार आहेत. अर्ज भरल्यानंतर शुल्क भरण्याची अंतिम तारीख १२ ऑगस्ट २०२५ आहे.

नाशिक विभागात अल्प उत्पन्न गटासाठी वडाळा शिवार येथील पार्श्वनाथ प्रोजेक्टमध्ये घरांची किंमत १२.६८ लाख ते १३.५५ लाख रुपये दरम्यान आहे. अडगाव शिवारातील प्रणव गार्डनमध्ये ही किंमत ११.९४ लाख ते १५.३१ लाख आहे.

मध्यम उत्पन्न गटासाठी अहिल्यानगर, सावेडी येथील घरांची किंमत केवळ ५.४८ लाख रुपये इतकी असल्याने ही संधी अतिशय आकर्षक ठरते.

या विभागात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नक्षत्रवाडी येथे १०५६ घरांची किंमत १५.३० लाख रुपये आहे. चिखलठाणामध्ये १५८ घरे २७ लाख रुपये, देवळाई येथील १४ घरे १३.१९ ते १६.१९ लाख रुपये, आनंद पार्क येथील १८ घरे ४.८५ ते ६.२७ लाख रुपये, तर काही घरे ३४ लाख रुपयांना देखील उपलब्ध आहेत. बीडमधील अंबाजोगाई येथे ९२ घरे १०.६५ लाख रुपयांना मिळणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर मंडळात एकूण तीन गटांमध्ये ही घरे विभागण्यात आली आहेत - प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ११४८ सदनिका, म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत १६४ सदनिका, आणि २०% सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ३९ सदनिका.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.