राज्यातले वरिष्ठ अधिकारी, माजी मंत्री, नेते हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकले असल्याची माहिती समोर आली होती. आता या प्रकरणात एका महिलाचे चौकशी सुरू आहे. त्या महिलेनं खळबळजनक खुलासे केले आहेत. नाशिकमधील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये अधिकारी आणि नेत्यांसोबत महिलेनं शरीरसंबंध ठेवून त्यांना ब्लॅकमेल केल्याचं समोर आलं होतं. संबंधित महिला नाशिकची असून सध्या ठाण्यात वास्तव्याला असल्याची माहिती समजते. महिला होमगार्ड म्हणून ती कार्यरत होती. यानंतर हनीट्रॅपच्या माध्यमातून तिनं मोठ्या प्रमाणावर अधिकारी आणि नेत्यांकडून पैसे उकळल्याचा आरोप आहे. या महिलेनं पत्रकार परिषद घेत अनेक खळबळजनक दावे केले आहेत.
करुणा शर्मा मुंडे यांनी या महिलेसह पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत करुणा मुंडे म्हणाल्या की, महाराष्ट्रात महिलांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरूय. या महिलेवर दोन पोलीस अधिकाऱ्यांनी बलात्कार केलाय. तक्रार करण्याचा प्रयत्न केला पण तिच्यासह मुलीवर गुन्हा दाखल केला गेला. तिच्या बाजूनं कुणीच बोलत नाहीय. रक्षकच भक्षक झाले आहेत.महिलेनं थोट पोलीस अधिकाऱ्यांची नावे घेत आरोप केले. उत्तम कोळेकर नावाच्या एसीपीने माझ्यासोबत ओळख करून नंबर घेतला. माझ्याशी बोलता बोलता चहासाठी पोलीस ठाण्यात बोलावलं. त्यांच्या बायकोचा तेव्हा फोन आल्यानं त्यांच्या घरी गेले. पण तिथं त्यांची बायको नव्हतीच. तिथं इंद्रजीत कारले नावाचा एसीपी होता. त्या दोघांनी मला गुंगीचं औषध देऊन बलात्कार केला.
दोन पोलीस अधिकाऱ्यांविरोधात कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तिथं माझा जबाबही घेतला. पीआय ढमाळ या महिला पोलीस अधिकाऱ्याने मला गप्प बसायला सांगितलं आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला. एसीपीनेही त्याला आलेला आंतरराष्ट्रीय कॉल माझ्या माध्यमातून आल्याचं म्हणलं आहे. मी हनीट्रॅप करते असा यांचा आरोप आहे. त्यांनी माझ्यासह माझ्या मुलीवरही गुन्हा दाखल केलाय.
दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांचा घाटकोपरला २ बीएचके फ्लॅट आहे. इथं दोघंही बांगलादेशी महिलांना घेऊन येतात. दारुचे बॉक्सही या फ्लॅटवर असतात. याच ठिकाणी ते दारू पितात, महिलांसोबत शरीरसंबंध ठेवतात असा खळबळजनक आरोप महिलेनं केला. गेल्या तीन महिन्यांपासून महिला आयोगाकडे जात असूनही यावर काहीच प्रतिसाद मिळालेला नाही असंही महिलेनं म्हटलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.