Big Breaking ! हनीट्रॅपच्या भीतीने अनेक पोलिस अधिकाऱ्यांना करावे लागले बार डान्सरशी लग्न! मुंबईतील धक्कादायक खुलासा!
मुंबईच्या अंडरवर्ल्ड आणि दहशतवादविरोधी कारवायांसाठी प्रसिद्ध असलेले माजी सहाय्यक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेत कार्यरत असताना त्यांनी अनुभवलेल्या आणि मुंबईतील डान्स बारच्या सुरुवातीच्या काळातील घटनांबद्दल त्यांनी एका मुलाखतीत सविस्तर माहिती दिली. हनीट्रॅपच्या भीतीने अनेक पोलिसांना डान्सरशी लग्न करावे लागल्याची गोष्ट त्यांनी सांगितली, ज्याला त्या काळात 'रिबेरो मॅरेज' असे नाव पडले होते.
डान्स बार आणि पोलिसांचे व्हीआयपी ट्रीटमेंट
1980 च्या दशकात मुंबईत डान्स बार नुकतेच सुरू झाले होते. या डान्स बारमध्ये पोलिसांना विशेष व्हीआयपी ट्रीटमेंट मिळायचे, असे बर्गे सांगतात. " पोलिस अधिकारी असल्याने डान्स बारमध्ये विशेष सन्मान मिळायचा. काही ठिकाणी तर क्राइम विभागाशी संबंधित व्यक्तींनाही प्रतिष्ठा मिळायची," असे त्यांनी सांगितले. या विशेष सत्कारातून काही पोलिस अधिकाऱ्यांचे डान्सर मुलींसोबत संबंध निर्माण झाले. मात्र, याच संबंधांमुळे अनेक अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकले.
अनेक अधिकाऱ्यांना डान्सरशी लग्न करणे हा एकमेव पर्याय
तत्कालीन पोलिस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांच्याकडे डान्सर मुली तक्रारी घेऊन यायच्या. बर्गे यांनी सांगितले की, "रिबेरो साहेब तक्रारीकडे गंभीरपणे पाहायचे. त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, गुन्हा दाखल झाला तर नोकरी जाण्याचा धोका आहे. त्यामुळे त्या अधिकाऱ्याला समजावा काय करणार आहे बघा." अशा परिस्थितीत अनेक अधिकाऱ्यांना डान्सरशी लग्न करणे हा एकमेव पर्याय वाटला. यामुळे अनेक पोलिसांनी त्या मुलींशी लग्न केले, आणि या लग्नांना 'रिबेरो मॅरेज' असे नाव पडलं.
लग्नांमुळे अनेक पोलिसांचे आयुष्य बदलले
बर्गे यांनी सांगितले की, अशा लग्नांमुळे अनेक पोलिसांचे आयुष्य बदलले. "आता त्या अधिकाऱ्यांना मुले आहेत, ती मोठी झाली आहेत आणि काही अधिकारी निवृत्तही झाले आहेत," असे ते म्हणाले. या घटनांना आता कित्येक वर्षे उलटली असली, तरी त्या काळातील 'रिबेरो मॅरेज' ही मुंबई पोलिस दलात चर्चेचा विषय होती. बर्गे यांच्या मते, हा काळ पोलिसांसाठी आव्हानात्मक होता, कारण बार डान्सर संबंधांमुळे अनेक जण अडचणीत सापडले.
हनीट्रॅपचा मुद्दा आजही चर्चेत
हनीट्रॅपचा मुद्दा आजही चर्चेत आहे. नाना पटोले यांनी नुकतेच 70 अधिकारी आणि अनेक मंत्र्यांचा हनीट्रॅपमध्ये सहभाग असल्याचा आरोप केला आहे. बर्गे यांचा खुलास्यामुळे या संदर्भात नवीन चर्चा निर्माण झाली आहे. भानुप्रताप बर्गे आझाद मराठी' या युट्यूब चॅनेलवर बोलत होते. हनीट्रॅपच्या माध्यमातून अनेकांना ब्लॅकमेल केले जाण्याच्या घटना आजही घडतात, आणि यामुळे प्रशासकीय आणि राजकीय स्तरावरही खळबळ उडाली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.